इंदापूर प्रतिनिधी:निमगाव केतकी येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर,कला महाविद्यालय भिगवण,श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय, बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर शुक्रवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ ते गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत आयोजित केले असून सदर शिबीरात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.*
*निमगाव केतकी येथे चिंचेच्या झाडालगत कुस्तीगीरांसाठी बांधलेला कुस्त्यांचा आखाडा आहे. त्या ठिकाणी कोविड काळामुळे जत्रा न भरल्याने मागील दोन वर्षापासून कुस्त्या झालेल्या नाहीत.त्यामुळे आखाडा व परिसरात झाडे-झुडपे वाढलेली होती,ही बाब सर्व निमगाव केतकी करांच्या बाबतीत आनंदाची नव्हती.
सदर कुस्तीच्या आखाड्या भोवती राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातील विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून कुस्ती आखाडा परिसर आणि आखाड्याची प्रथम सर्व प्रकारची स्वच्छता करून त्या ठिकाणची काटेरी झुडपे आणि गवत काढण्यात आले. कुस्ती आखाड्यातील कठीण झालेली माती खोदून भुसभुशीत केली. त्यामुळे जर त्या ठिकाणी सध्या कुस्त्यांचा आखाडा घेतलाच तर त्याची पूर्ण तयारी या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिनांक १५ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. त्यामुळे निमगाव केतकी करांच्या वैभवास एक प्रकारचा उजाळा देण्याचे कार्य या शिबीराद्वारे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आणि श्री शिवाजी एज्यूकेशन सोसायटी,बावडा या संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर, भिगवण आणि बावडा महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन निमगाव केतकीत अतिशय स्तुत्य असे उपक्रम राबवून उत्तम असे शिबीर राबवले.या शिबीरास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषेदेचे सदस्य व आय कॉलेज इंदापूरचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, भिगवण कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज व श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडाचे प्रभारी प्राचार्य डॉ. लहू वावरे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे तालुका समन्वयक डॉ.प्रकाश पांढरमिसे,व रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र साळुंखे, डॉ. अनिल बनसोडे,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.गजानन कदम, डॉ. मनीषा गायकवाड,डॉ. संजय मोरे, प्रा.भारत शेंडे ,प्रा. विशाल चिंतामणी, प्रा. सोपान भोंग व इतर सर्व प्राध्यापक मार्गदर्शकांनी नियोजन व मार्गदर्शन केले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती सदस्य देवराज जाधव, माजी पंचायत समिती सभापती अंकुश जाधव, माजी जि. प. सदस्या शालनताई गणपत भोंग सरपंच प्रवीण डोंगरे, उपसरपंच सौ. मीनाताई भोंग, सर्व ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक अमोल मिसाळ, संपतराव चांदणे,राजकुमार जठार,राजू शेठ,मुक्तार मुलाणी, जाकीर मुलाणी, बबलू पठाण,पुरुषोत्तम भागवत,सावता भोंग,भारत शेंडे, पक्षी मित्र धनाजी राऊत,बाबाजी भोंग या सर्वांनी सहकार्य केले.