इंदापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे जिल्हा प्रवक्तेपदी श्री. वसंतराव आरडे यांची नियुक्ती करण्यात आली असून निवडीचे सदर बाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांचे हस्ते काल देण्यात आले.या वेळी बोलताना गारटकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा. सुनीलजी तटकरे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे, आचार-विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी वसंतराव आरडे सातत्याने प्रयत्नशील राहतील असा मला विश्वास आहे. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची व्यवस्थित मोट बांधून त्यांना योग्य मार्गदर्शन वसंतराव आरडे यांच्याकडून होईल व ते ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडतील त्याचप्रमाणे प्रवक्ते पदाचीही जबाबदारी अतिशय जबाबदारीने पार पाडतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी यावेळी व्यक्त केला. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर नवनिर्वाचित प्रवक्ते वसंतराव आरडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भल्यासाठी वेळोवेळी मी जिल्हाध्यक्ष आमदार दत्तात्रय भरणे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेन व ज्या ज्या वेळी पक्षाची भूमिका मांडायचे असेल ती योग्य भूमिका मी समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करीन असे यावेळी वसंतराव आरडे म्हणाले.या वेळी तालुकाध्यक्ष हणमंत कोकाटे,नवनाथ रूपनवर, धनंजय बाब्रस, सह इतर मान्यवर उपस्थित होते. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वसंत आरडे यांच्या स्वरूपात एक अनुभवी व मातब्बर नेतृत्व मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ मिळणार एवढं मात्र नक्की..
Home Uncategorized राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे जिल्हा प्रवक्तेपदी श्री. वसंतराव आरडे यांची निवड.