इंदापूर: गेल्या वर्षी म्हणजेच 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने इंदापूर तालुक्यातील अण्णासाहेब धोत्रे यांना भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली होती.अण्णासाहेब धोत्रे हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर व आमदार दत्तात्रय भरणे यांचे निकटवर्तीय मानले जातात. पक्षाने 2022 ला दिलेली जबाबदारी खांद्यावर घेत पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन गाव तिथे शाखा व कार्यकारणी जाहीर करत अण्णासाहेब धोत्रे यांनी पक्षाचे लक्ष वेधले होते. इंदापूर,बारामती, पुरंदर,भोर,दौंड या तालुक्यांमध्ये या सेलच्या माध्यमातून मजबूत बांधणी केली होती. गावा गावामध्ये बैठका लावत गोरगरीब लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन पक्षाच्या माध्यमातून त्या सोडवण्याचा 2022 सालापासून प्रयत्न करत आहेत.खरंतर आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानंतर कार्यकर्ता कितीही गरीब असला तरी पक्ष त्याची दखल घेतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर १ मुळगाव असलेले अण्णासाहेब धोत्रे..राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून अण्णासाहेब धोत्रे हे तन-मन -धनाने राष्ट्रवादी पक्षाची एकनिष्ठता जपत व समाजातील तळागाळातील लोकांसाठी अहोरात्र काम करत राहिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अण्णांच्या कामाची व एकनिष्ठेची दखल घेऊन भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.गेल्या वर्षी 14 नोव्हेंबर रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमांमध्ये याच सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांच्या हस्ते तर इंदापूरचे कर्तबगार आमदार दत्तामामा भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या उपस्थितीत सदरचे नियुक्तीपत्र देण्यात आले होते.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे अशांच्या यादीमध्ये अण्णासाहेब धोत्रे यांचे नाव घेतलं जातं. अण्णासाहेब धोत्रे यांच्या एकनिष्ठतेमुळे 2012 पासून त्यांना वेगवेगळ्या पदावर राष्ट्रवादीने विराजमान केले होते यामध्ये 2012 साली ते तालुका उपाध्यक्ष म्हणून प्रथमच निवड करण्यात आली होती. 2016 ते 2020 पर्यंत युवक जिल्हा सरचिटणीस पदी त्यांची निवड करण्यात आली होती तर 2021 मध्ये भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या तालुकाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. हे पद व्यवस्थित रित्या सांभाळल्यामुळे सध्या 2022 ला त्यांची याच सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती आणि त्यानंतर 2023 ला जिल्हाध्यक्ष पदाची फेर निवड करण्यात आली आहे.या निवडीनंतर माध्यमांशी बोलताना अण्णासाहेब म्हणाली की यापुढेही पक्षाने दिलेल्या जबाबदारीचा मी स्वीकार करून पक्ष बांधणी व सामान्य जनतेला न्याय मिळण्याकरिता जिल्हाभर दौरा करून कार्यकर्त्यांची टीम तयार करणार आहे. व सर्वांचा संपर्क नंबर घेऊन व्हाट्सअप ग्रुप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुका निहाय ग्रुप तयार करणार आहे. यातूनच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे असे नूतन जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे म्हणाले.ते पुढे म्हणाले की जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात जाऊन गाव तिथे शाखा तयार करून जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघातील लवकरात लवकर दौरा करून कार्यकारणी जाहीर करण्यासाठी वरिष्ठांना विनंती करणार आहे असे अण्णासाहेब धोत्रे म्हणाले. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर व आमदार दत्तामामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही राष्ट्रवादी वाढवण्याचा मी सदैव प्रयत्न करीन असे अण्णासाहेब म्हणाले.एकंदरीतच अण्णासाहेब धोत्रे यांच्या एकनिष्ठेमुळे पक्षाने त्यांना दिलेली वेगवेगळी पदे व पदे मिळाल्यानंतर जबाबदारीने पक्ष वाढवण्याकरता अण्णासाहेब धोत्रे यांची धडपड हे एक उत्तम कार्यकर्त्याचे उदाहरण म्हणता येईल.
Home Uncategorized राष्ट्रवादीने दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्यामुळे अण्णासाहेब धोत्रे यांची भटक्या विमुक्त जाती...