….तर भाजपचा एकही कार्यकर्ता रस्त्यावर फिरणार नाही – तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे.
इंदापूर ता.प्रतिनिधी: निलकंठ भोंग
इंदापूर: राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दि.०८ एप्रिल रोजी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. महाविकास आघाडीचे ज्येष्ठे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन केलं.या आंदोलनानंतर सर्व स्तरातून याचा निषेध नोंदवण्यात येत असून इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने देखील या कृत्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी कार्यालय ते इंदापूर प्रशासकीय भवन येथे घोषणाबाजी करीत निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावेळी बोलताना हनुमंत कोकाटे म्हणाले की पवार साहेबांच्या घरावर जो हल्ला झाला त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो. जे आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे.
आम्हाला पण इथे भाजपाच्या नेत्यांचे बंगले जवळचं आहेत.आम्ही जर ठरवले तर त्याच्यावर आत्ता लगेचचं हल्ला करु शकतो परंतु आमच्या खा.शरद पवार यांचे संस्कार आहेत.या घटनेच्या मुळापर्यंत जावून ज्यांनी हा हल्ला केला त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सदर मागणीचे लेखी निवेदन तहसिलदार श्रीकांत पाटील,पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांना देण्यात आले.
यावेळी तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे,जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील,श्रीमंत ढोले,जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ,माजी सभापती प्रशांत पाटील,शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे,माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, रमेश पाटील, बाळासाहेब व्यवहारे,नगरसेवक अमर गाडे,अनिकेत वाघ,अतुल शेटे पाटील,पोपट शिंदे,माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, श्रीधर बाब्रस,अमोल भिसे,बापूराव शेंडे,नाना नरुटे,सुभाष डरंगे-पवार,युवक तालुकाध्यक्ष अँड.शुभम निंबाळकर,कार्याध्यक्ष सचिन खामगळ,विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष सागर व्यवहारे, निमगाव केतकी चे सरपंच प्रवीण डोंगरे,अक्षय कोकाटे,सागर पवार,अहेमदरजा सय्यद,इम्राण शेख,वसिमभाई बागवान,
महिला शहराध्यक्ष उमा इंगोले,अश्विनी फुर्डे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राची सामाजिक व राजकीय संस्कृती दूषित करण्याचे काम आज आंदोलकांच्या कडून करण्यात आले! आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घरावर करण्यात आलेल्या दगडफेकीच्या घटनेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो- दत्तामामा भरणे