राष्ट्रपती पुरस्कार विजेते व माजी ए‌.टी.एस.प्रमुख भानूप्रताप बर्गे यांचा वाढदिवस ऑनलाइन पद्धतीने इंदापुरात साजरा.

आज इंदापूर येथे शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थान चे अध्यक्ष पैलवान दीपक अण्णा पाटील यांच्या वतीने माननीय श्री बानू प्रताप बर्गे राष्ट्रपती पुरस्कार विजेते माजी ए.टी.एस. प्रमुख यांचा वाढदिवस इंदापूर येथे अनाथ मुलांना त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन साजरा करण्यात आला.इंदापूर येथील मूकबधिर निवासी विद्यालय तसेच श्रावण बाळ आश्रम शाळा येथील मुले व मुली यांना मोफत कपडे वाटप करण्यात आले तसेच येथील विद्यार्थ्यांसाठी एक्वा आर वो फिल्टर देण्यात आला तसेच येथील सर्व अनाथ विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले.त्यावेळी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी एटीएस बर्गे साहेब यांच्या वतीने करण्यात आला. बर्गे साहेब यांनी अनाथ मुलांना शुभेच्छा देऊन भेट देण्याचे कबूल केले तसेच त्यांनी शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक अण्णा काटे यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे धन्यवाद मानले. व त्यांना अशाच प्रकारे समाज कार्य करण्यासाठी शक्ती लाभो ही प्रार्थना केली. यावेळी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थी तसेच श्रावण बाळ आश्रमातील विद्यार्थी शिक्षक वर्ग उपस्थित होता .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवधर्म फाउंडेशन चे अध्यक्ष दीपक काटे ,मंथन पवार, करण दाने पाटील, प्रणव गवळी, संजय बाबा मदने, नितीन सोनवणे, स्वप्निल निंबाळकर, किरण साळुंखे, संजय शिंदे, संजय सर्जे, पारस राजे, धनंजय कळसाईत, संजय खंडागळे, सचिन चौगुले, हनुमंत बंडलकर, प्रकाश दादा खिलारे, धीरज देवकाते, सौदागर खबाले, अमोल पवार, दीपक शिंदे, मयुरी इंगळे, ओंकार कोळेकर, कृष्णा भाऊ क्षीरसागर, अक्षय चव्हाण, अनिल धोत्रे ,अजय पवार, सुनील भाऊ कोकाटे, यश निंबाळकर अमर दादा नलवडे , किरण पवार ,रोहित इंगळे , सुनील देवकर, सूर्यवंशी, निलेश सोनटक्के, अतिश पवार, धनु शिंदे, भवनेश्वर शिनगारे, इत्यादींनी यावेळी सहकार्य केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here