राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच मराठी पत्रकार परिषदे समवेत बैठक.

सातारा : राज्यातील पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न सोडवले जातील.त्या साठी राज्यातील पत्रकारांची प्रबळ संघटना असलेल्या मराठी पत्रकार परिषदे समवेत लवकरच बैठक आयोजित करू,अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र ना.एकनाथ शिंदे यांनी दिली.मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर येथे मुक्कामी आहेत.राजभवन येथे प्रथमच त्यांनी अधिकृत पत्रकार परिषद घेतली.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख यांच्या सूचनेनुसार या पत्रकार परिषदे दरम्यान मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सातारा जिल्हा पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत.अनेक सरकारे आली आणि गेली पण पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही .मराठी पत्रकार परिषद ही एस. एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लढणारी संघटना आहे.३६ जिल्हे व ३५० तालुक्यात मराठी पत्रकार परिषदेच्या शाखा आहेत.पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्या साठी व न्याय मिळवून देण्यासाठी एस. एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ल मराठी पत्रकार परिषदेच्या आमच्या राज्यस्तरीय शिष्ट मंडळाला मुंबईत वेळ मिळावी अशी आग्रही मागणी यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या कडे केली.मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी ही पत्रकारांनी मला ही खूप मदत केली आहे.त्यांचे प्रश्न नक्की सोडवू असे सांगत लवकरच मराठी पत्रकार परिषदेसंमवेत बैठक लावण्याच्या सूचना अधिकाऱ्याना दिल्या.राज्य व सातारा जिल्ह्याचे प्रश्न सोडवताना तुम्ही ही सूचना करत चला ,त्याचा नक्की विचार करू असे ही मुख्य मंत्री म्हणाले .निवेदन देताना मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे, महाबळेश्वर पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास काळे,सातारा शहर पत्रकार संघाचे खजिनदार राहुल तपासे,सोशल मीडिया सेलचे चंद्रसेन जाधव, वाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वास पवार,सातारा जिल्हा इले.मिडियाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव, सोशल मीडिया सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत जगताप, इम्तियाज मुजावर,नीलेश शिंदे,दिनकर थोरात, प्रेषित गांधी,अभय हवालदार ,अजित जाधव, केळगणे,संजय दस्तुरे यांच्या सह प्रिंट , इले्ट्रॉनिक्स, सोशियल मीडिया चे पत्रकार उपस्थित होते .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here