इंदापूर || गेल्या काही महिन्यांपासून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात चौफेर विकासाची गंगा वाहत असतानाच आता शुक्रवारी ता.२७ मे बावडा येथे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत खास बावडा गाव व पंचक्रोशीतील लोकांना करीता ६९ कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन समारंभ होणार आहे. सायंकाळी ६ वाजता बावडा गावातील बाजार तळावर राज्यमंत्री भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर सभा होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कांग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर असणार आहेत.
💥याकामांचे होणारे उद्धाटन आणि भूमिपूजन
👉बावडा निरा नरसिंहपूर रस्त्याचे लोकार्पण ५७ कोटी
👉बीकेबीएन रस्त्यावरील बावडा हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्र ते निरा नरसिंहपुर रस्ता चौपदरीकरण व सुशोभिकरण करणे ४ कोटी 👉बावडा, शेटेवस्ती ते भांडगांव रस्त्यावर तीन ठिकाणी पुल बांधणी ३ कोटी
👉गणेशवाडी ते गारअकोले रस्ता करणे २ कोटी
👉बावडा, बागलफाटा येथील बागलवस्ती बंधारा बांधणे ४४.६२ लाख 👉बावडा येथील (निवृत्ती घोगरे फार्म) बंधारा बांधणे ३६.१३ लाख
👉बावडा येथे (स्मशानभूमी जवळ) बंधारा बांधणे २३.९६ लाख,
👉बावडा येथील जिवननगर रस्ता करणे २० लाख
👉बावडा येथील (ऋतुराज घोगरे फार्म जवळ) बंधारा बांधणे १९.९३ लाख 👉बावडा येथील आण्णाभाऊ साठे समाज मंदीर बांधणे १० लाख
👉बावडा येथील आण्णाभाऊ साठे समाज मंदीर परिसरात पेव्हिंगब्लाक १० लाख
👉बावडा येथील रामोशी समाज मंदीर बांधणे १० लाख
👉 बावडा येथे मुस्लिम समाजासाठी शादीखाना बांधणे १० लाख
👉बावडा येथील मातंगवस्ती पिंपरजची आई मंदीर ते गौतम गायकवाड यांच्या घराकडे जाणारा रस्ता १० लाख
👉बावडा येथील आतारवस्ती ते घोगरेवस्ती रस्ता ८ लाख
👉बावडा येथील घोगरेवस्ती ते रमामातानगर रस्ता ७ लाख बावडा येथे भांडगाव रोड ते काकडेवस्ती रस्ता करणे ७ लाख.
👉बावडा येथील वालचंदनगर रोड ते मोरेवस्ती (जिवननगर) रस्ता ७ लाख 👉बावडा येथील नरसिंहपूर रोड ते बाजीराव घोगरेवस्ती रस्ता ७ लाख
👉बावडा येथील शिंदेवस्ती अंतर्गत रस्ता करणे ७ लाख
👉बावडा येथील विद्यासागर घोगरे व वालचंदनगर चौक, गणेशवाडी दत्ता घोगरेवस्ती, गायकवाडवस्ती, नरसिंहपूर रोड येथे हायमास्ट दिवे बसविणे ६ लाख 👉बावडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान विकसित करणे ५ लाख 👉 जाकीर शेख वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण ५ लाख 👉बावडा येथील लिंगायत समाज दफनभूमी सुधारणा करणे ५ लाख👉बावडा येथील शिंदेवस्ती येथे हायमास्ट दिवे बसविणे ३ लाख 👉बावडा येथील नरसिंहपूर रोड ते नागेश गायकवाडवस्ती रस्ता ३ लाख
अशा पद्धतीने इंदापूर तालुक्यात चौफेर विकास कामाची गंगा वाहत असताना बावडा शहर यापासून वंचित राहू नये याची पुरेपूर काळजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतलेली दिसून येते. इंदापूर तालुक्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू असलेले बावडा गाव आणि या गावातच आता एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणल्यानंतर होणाऱ्या जाहीर सभेत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे काही बोलतील? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.या नियोजित कार्यक्रमासाठी माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, मा.बांधकाम सभापती प्रवीण माने,मा.जि प.सदस्य श्रीमंत ढोले,मा.पं.स.सभापती प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जि.प. सदस्य अभिजित तांबिले, जि.नि.समिती सदस्य सचिन सपकळ, युवानेते दिपक जाधव,कार्याध्यक्ष अतुल झगडे, दत्तात्तय घोगरे, बाळासाहेब करगळ, पंचायत समिती सभापती स्वाती शेंडे, महिलाध्यक्षा छाया पडसळकर, महारुद्र पाटील यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.