राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी शुभम सोबत संवाद साधत घेतला युक्रेन येथील परिस्थितीचा आढावा

इंदापूर :इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर 2 येथील शुभम संदीप पाडुळे हा विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकला आहे. तेथे चालू असलेल्या युद्धामुळे शुभमचे कुटुंबीय चिंतेत आहेत. महाराष्ट्राचे माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मा.हर्षवर्धनजी पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करत शुभमला मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक चि.राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी शुभम सोबत व्हाट्सअप कॉल द्वारे संपर्क करत त्याला धीर दिला व आपुलकीने त्याची विचारपूस केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here