इंदापूर: काझड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते दासा गंगाराम नरूटे पाटील, हनुमंत नाना काळे, नामदेव दिनकर नरूटे, बाळासाहेब साहेबराव नरूटे, शंकर ज्ञानदेव वीर या सर्व कार्यकर्त्यांनी इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे कोअर कमिटीचे अध्यक्ष राजवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.यावेळी काझड येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाथा नाना पाटील, तुषार ठोंबरे माजी नगरसेवक शेखर पाटील यावेळी उपस्थित होते.भारतीय जनता पक्षाचे विचार, कार्यपद्धती तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी पक्षाचे प्रयत्न लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.राजवर्धन पाटील यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या.
Home Uncategorized राजवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत काझडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता...