वैभव पाटील :प्रतिनिधी
जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा,केंद्र कोशिंबी,भिवंडी येथे दि.6 मे 2023 रोजी सकाळी ठीक 9 वाजता राजर्षी छत्रपती शाहूमहाराज स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाले.प्रथम छत्रपती शाहूमहाराज यांचे प्रतिमेला मुख्याध्यापक जगदीश जाधव यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन सहशिक्षका दिलशाद शेख व विद्यार्थीनींनी करून अभिवादन केले.सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी “छत्रपती शाहूमहाराज यांचे शैक्षणिक कार्य” या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन करून अभिवादन केले.शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहूशाहूमहारांच्या जीवनावर माहिती सांगून अभिवादन केले.विद्यार्थ्यांनी पाना फुलांची सुंदर रांगोळी काढून शालेय परिसर सुशोभित करण्यात आला.छत्रपती शाहूमहाराज स्मृतिदिनाचे औचित्य साधून इयत्ता पहिले ते चौथीच्या विद्यार्थांचा वार्षिक निकाल घोषित करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी केले. विद्यार्थांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Home Uncategorized राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हापरिषद डोहोळेपाडा शाळेत केले अभिवादन..