राजमाता जिजाऊंने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवरायांनी सत्यात उतरविले- राजवर्धन पाटील

अवसरी मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.

इंदापुर:शिवछत्रपती मित्र मंडळ अवसरी आयोजित शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात अवसरी मध्ये साजरी करण्यात आली. या शिवजयंती उत्साहात साठी नीरा-भीमा कारखान्याचे चेअरमन राजवर्धन दादा पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी राजवर्धन पाटील म्हणाले की शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रू अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूंना धूळीत पाडले.आणि राजमाता जिजाऊंने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले. शिवरायांनी अनेक गड जिंकले गुलामगिरी नष्ट केली रयतेला अंधारातून प्रकाशात आणले. स्त्रियांना आदर व सन्मान दिला, शेतकऱ्यांना मान दिला. या कार्यक्रमात शिवछत्रपती मित्र मंडळाचे अध्यक्ष अवसरी गावचे सरपंच श्री संदेश शिंदे, मंडळाचे उपाध्यक्ष प्रसाद शिंदे ,आणि राजवर्धन दादा पाटील यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. शिवजयंतीनिमित्त लहान मुलांच्या आग्रहास्तव जादूचे कार्यक्रम ही मंडळाने ठेवला होता. या शिवजयंती मध्ये अंगावर शहारे आणणारे शिव विचार सांगणारे भाषणे कुमारी श्रुती तावरे ,साक्षी जाधव गायत्री शिंदे ,पूनम सावंत ,अस्मिता सर्जे, यांनी केली. शिवजयंतीला अवसरी गावातील व परिसरातील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. श्री शिवछत्रपती मित्र मंडळाचे स्वप्नील घोगरे ,शहाजी सावंत संकेत देवकर सुरज जाधव, संदेश सावंत सोमनाथ जाधव, योगेश कांबळे ,सोमनाथ कवितके ,समाधान मोरे ,सोमनाथ शिंगटे दिनेश शिंदे ,अजित साळुंखे ,नंदकुमार कांबळे रवींद्र काटे, राहुल मरळे ,समाधान शिंदे, या सर्व मित्र मंडळ कार्यकर्त्यांनी हा शिवजयंती उत्सव उत्साहात पार पाडण्याचे चांगले आयोजन केले होते. अवसरी गाव आठ दिवस अगोदरच शिवमय झाल्याचे दिसत होते. हा शिवजयंती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here