महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज या महाविद्यालयाचे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम शिबिराचे उदघाटन समारंभ आज निमगाव केतकी येथे श्री संत सावतामाळी कार्यालय येथे संपन्न झाला.
या उद्घाटनप्रसंगी इंदापूर तालुका भाजपा संघटन सरचिटणीस राजकुमार जठार,ज्येष्ठ शेतकरी कांतीलाल भोंग,ग्रामपंचायत सदस्य अनिल भोंग,पोलिस पाटील अतुल डोंगरे,भाजपा निमगाव केतकी शहराध्यक्ष गणुकाका घाडगे,अँड सचिन राऊत,युवा नेते महेश जठार व निमगाव केतकीचे शेतकरी वर्ग यांच्या उपस्थितीत पार पडला.
हे शिबिर प्राचार्य आर.जी.नलवडे सर,कार्यक्रम समन्वयक एस एम एकतपुरे सर,एस एस भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे .खरे तर या शिबिराचा मुख्य हेतू हा आहे आपला देश कृषी प्रधान देश आहे म्हणून ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन या विध्यार्थीनी शेताच्या बांधावर जाऊन करणार आहेत तसेच झाडे लागवड,शेतकऱ्यांना हवामान महिती,जनावरांना लसीकरण,पिकांवरील रोग व त्याचे नियंत्रण,पिकांना हानिकारक असणाऱ्या कीटकांचा अभ्यास व त्या वरती नियंत्रण कसे आणता येईल यांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांन सामोर केले जाणार आहे.
या शिबिराचे आयोजन रत्नाई महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी संजना मोहिते,कु शिवांजली बडे,धनश्री जगताप,गिरिजा इनामदार,पल्लवी कोळी,राजनंदिनी माने देशमुख,कोमल इंगळे यांनी केले.सूत्र संचालन कु संजना मोहिते या विध्यार्थीनीने केले तर आभार प्राचार्य सचिन भोसले सर यांनी मानले.