रणमर्द मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती निमसाखरच्या माध्यमातून शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा.

निमसाखर(प्रतिनिधी: विशाल रणवरे):-हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रणमर्द मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने निमसाखर गावामध्ये तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.दिनांक १८ फेब्रुवारी रोजी विठ्ठल मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन माजी सरपंच बाबुराव रणवरे व सामाजिक कार्यकर्ते पप्पू पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ५५ बॅग रक्त संकलित झाले. या कार्यक्रमास मुक्ताई ब्लड बँक इंदापूर यांनी सहकार्य केले.दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शिवप्रतिमिचे पूजन निमसाखरचे सरपंच धैर्यशील रणवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
दुपारी १२ वा निरभिमा सह सा का चे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते जि प प्राथ शाळा निमसाखर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
रात्री ७ वाजता गणेश सप्रे प्रस्तुत हीपनोटिझम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे, युवानेते दीपक जाधव, adv नितीन कदम, संदीप चौधरी आदींनी भेटी दिल्या. नागरिकांनी व मुलांनी या कार्यक्रमास मोठी गर्दी केली होती.
३ दिवसीय उत्सवास गावातील *सरपंच धैर्यशील रणवरे, माजी सरपंच बाबुराव रणवरे, निराभिमा सह सा कारखान्याचे संचालक रमेश गोरे, संतोष पाटील, पप्पू पाटील, युवराज रणमोडे, अनिल आबा रणवरे, अनिल बोंद्रे, संतोष रणसिंग, अजित माळी, दत्तात्रय चौधरी, धोंडीराम कारंडे, गोरख शेळके, दीपक लवटे, राजेंद्र रनमोडे, राजेंद्र बर्गे, लालासाहेब चव्हाण, पांडुरंग पानसरे, सुनिल रणवरे, शेखर पानसरे, अतुल जाधव यांच्यासह गावातील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे आजी माजी सदस्य, विविध सामाजिक, राजकीय पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवतेज ग्रुप, आझाद मित्र मंडळ, छत्रपती ग्रुप, व मंडळाचे सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी सहकार्य केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here