युवा नेते राजवर्धन पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह..

इंदापूर: भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली असून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणीनंतरच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.राजवर्धन पाटील यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली असता आज त्यांची
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना खबरदारी घेण्याचे तसेच लक्षणे जाणवत असेल तर चाचणी करण्याचे आवाहन राजवर्धन पाटील यांनी केले असून आपल्याला सौम्य लक्षणे जाणवत होती तसेच आपली तब्येत उत्तम असून या कोरोना पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी राजवर्धन पाटील यांनी केले आहे.
राजवर्धन पाटील हे युवक वर्गांचे प्रेरणास्त्रोत असून कोरोना कालखंडात त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला. कोरोना कार्यकाळात देखील त्यांनी अनेक कुटुंबांना भेटी दिल्या त्यांची विचारपूस केली, मदत केली. लग्न समारंभाला उपस्थिती लावत त्यांच्या आनंदात सहभागी झाले. विशेष करून त्यांनी अनेक ठिकाणी सांत्वन भेटी देत अनेकांना आधार दिला.
यातून लवकरच बरे होऊन जनतेच्या सेवेसाठी आपण तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here