युती सरकारमुळे महाराष्ट्राची प्रगतीपथाकडे वाटचाल – हर्षवर्धन पाटील

इंदापूर :प्रतिनिधी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली युतीचे सरकार सत्तेवर आल्याने आता महाराष्ट्राची प्रगतीपथाकडे वाटचाल सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे मार्गदर्शन व पाठबळ राज्य सरकारला असल्याने महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे, असे असे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी केले.
विधानसभेत राज्य सरकारने बहुमत चाचणी मोठ्या फरकाने जिंकली. महाविकासआघाडीला शंभरचा आकडा ही पार करता आला नाही. त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी नूतन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. राज्यात गेली अडीच वर्षे वेगवेगळे विचार असलेल्या तीन पक्षांचे, अनैसर्गिक पद्धतीने एकत्र आलेले सरकार सत्तेवर असलेने जनहिताची कामे होऊ शकली नाहीत. अनैसर्गिक सरकार टिकणार नाही, हे आम्ही जाहीरपणे सतत सांगत होतो. भाजप-शिवसेनेने विधानसभा निवडणूक एकत्रित लढवली होती व त्यामुळे लोक भावना ही युती बरोबरच होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकत्र असणारे शिवसेनेचे बहुतांशी शिलेदार आता पुन्हा भाजप बरोबर एकत्र आल्याने महाराष्ट्रात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत व अभ्यासू नेते आहेत, त्यांच्याकडे राज्याच्या विकासाची दूरदृष्टी आहे तसेच सर्व क्षेत्रातील प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे आता राज्यातील जनतेसाठी प्रगतीची दारे आता खुली झाली आहेत, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले. नवीन सरकार राज्यातील जनतेला लोकाभिमुख प्रशासन देईल, असेही यावेळी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here