यशकल्याणी सेवाभावी संस्था करमाळा येथे बाल दिन कार्यक्रम साजरा.

प्रतिनिधी: संतोष तावरे

करमाळा: बालदिनाचे औचित्य साधून यशकाल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा. गणेशजी करे पाटील सर यांनी जीनियस अबॅकस सेंटर च्या मुलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. चंद्रहास बापू निमगिरे, करमाळा तालुक्याचे मा.शिक्षणाधिकारी बदे साहेब, ज्ञानदा अँकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष मा. अमोल धुमाळ सर, अनमोल मिनरल वॉटर कंपनी चे चेअरमन मा. सुहास डांगे तसेच यशकल्यानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. गणेशजी करे पाटील सर आदी मान्य वर उपस्थित होते. जीनियस अबॅकस क्लास च्या संचालिका कु. अंकिता वेदपाठक मॅडम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व बालदिनाच्या शुभेच्या देऊन
कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच क्लासचे विद्यार्थी स्वरा निर्मळ, पलक बलदोटा, वेदांती निमगिरे, रीहान शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर स्वरा निर्मळ, अदिती व नंदिनी कानगुडे , सृजन घाडगे यांनी अबॅकस चे गणिताचे डेमो सादर केले.
यावेळी पालकांमधून दिगंबर निर्मळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे बदे साहेब, चंद्रहास बापू निमगिरे, अमोल धुमाळ सर, सुहास डांगे यांनी मुलांना बालदिनाच्या शुभेच्या देऊन मुलांचे कौतुक केले मुलांना प्रोत्साहन दिले .यशकाल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. गणेशजी करे पाटील सर यांनी मुलांच्या यशाबद्दल कौतुक केले,आजची मुलं ही भारत मातेच्या गळ्यातील दागिना झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रोत्साहन दिले , मुलांना अशी कौतुकाची थाप दिली व पुढील वाटचालीसाठी तसेच बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. समर नॅशनल अबॅकस
परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल
जीनियस अबॅकस क्लास च्या सर्व मुलांना यशकाल्याणी संस्थेच्या वतीने मेडल , प्रमाणपत्र, खाकी पर्व पुस्तक देऊन गौरविण्यात आले. क्लासच्या संचालिका कु. अंकिता वेदपाठक मॅडम यांना पुष्गुच्छ व खाकी पर्व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच क्लासच्या संचालिका अंकिता वेदपाठक मॅडम यांनी यशकल्यानी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. गणेशजी करे पाटील सर यांचे आभार मानले.कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे व पालकांचे आभार मानले. अशा प्रकारे कार्यक्रम संप्नन झाला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here