यवतमध्ये महाराष्ट्र बँकेच्या ATM वर चोरट्यांचा डल्ला, लुटली तब्बल 23 लाख रोकड..

प्रतिनिधी: गणेश खारतोडे.
यवत: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी एका एटीएमवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले आहे. यावेळी चोरट्यांनी एटीएममधील तब्बल 23 लाख रुपयांची रक्कम चोरुन नेली आहे. ही घटना यवत येथे पुणे-सोलापूर महामार्गालत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम सेंटरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील यवत गावातील महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर काही अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. आरोपींनी गॅस कटरच्या सहाय्याने अलगदपणे एटीएम फोडलं आहे. यावेळी चोरट्यांनी एटीएममधील तब्बल 23 लाख 81 हजार 700 रुपयांची रोकड पळवली आहे. रविवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची गुन्हे शाखा आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी एटीएम कॉन्ट्रॅक्टर विकास जालिंदर भगत यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळाला भेट देऊन पोलिसांना सूचना केल्या. तत्पूर्वी घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण पवार , सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे , पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे व पोलीस पथकाने पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here