रवींद्र शिंदे : पुणे जिल्हा प्रतिनिधी
म्हाडा अधिकाऱ्यांना ॲानलाइन सोडतीत घुसवण्याचा डाव उधळला! उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे तात्काळ म्हाडा अधिकाऱ्यांना ॲानलाइन सोडतीत घुसवण्याचा डाव उधळला! उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे तात्काळ कारवाई.यापुढील म्हाडाची सोडत संपूर्णपणे पारदर्शक असेल. या प्रक्रियेत म्हाडा अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष संपर्क येणार नाही. फक्त घराचा ताबा देण्यापुरताच म्हाडा कार्यालयाचा संपर्क येणार आहे.
मुंबई तसेच कोकण गृहनिर्माण मंडळासाठी काढण्यात येणाऱ्या सोडतीत घराचा ताबा मिळेपर्यंत म्हाडा कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क येऊ नये, अशा रीतीने तयार करण्यात आलेल्या सॅाफ्टवेअरमध्ये बदल करून म्हाडा अधिकाऱ्यांना त्यात घुसवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे उधळला गेला आहे. त्यामुळे आता यापुढील सोडती म्हाडा अधिकाऱ्यांच्या संपर्काशिवाय होणार आहेत. फक्त घराचा ताबा घेण्यापुरताच म्हाडा कार्यालयाचा संबंध येणार आहे.यापुढील सोडत संपूर्णपणे पारदर्शक असेल. या प्रक्रियेत म्हाडा अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष संपर्क येणार नाही. फक्त घराचा ताबा देण्यापुरताच म्हाडा कार्यालयाचा संपर्क येईल, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी दिली.
Home Uncategorized म्हाडा अधिकाऱ्यांना ॲानलाइन सोडतीत घुसवण्याचा डाव उधळला! उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे तात्काळ कारवाई.