मोई ग्रामपंचायत वर सदस्य व उपसरपंचपदी बिनविरोध निवड.

👆👆 या सिम्बॉल वर क्लिक करून चैनल सबस्क्राईब करा

पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यातील मोई गावात ग्रामपंचायत सदस्य पदी मा श्री.गोरखबाप्पु भिकाजी गवारी व मा.श्री.दादा बबन साकोरे यांची बिनविरोध निवड झाली.तसेच उपसरपंचपदी मा.सौ.शितलताई निलेश गवारी यांची बिनविरोध निवड झाली. मोई गावात बिनविरोध निवड करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निमित्ताने मोठा सत्कार समारंभ मोई गावात पार पडला.या समारंभ ला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ या वेळेस उपस्थित होते. या बिनविरोध निवड मुळे नक्कीच मोई गावच्या विकासाला चालना मिळणार आहे.मोई गाव
खेड (राजगुरूनगर) तालुक्यात आहे.तालुक्यामधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here