मूळ सासवडचा पण सध्या पुण्यात स्थायिक असलेला ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपरकिंगचा ऑरेंज कॅप चा मानकरी

रवींद्र शिंदे: पुणे प्रतिनिधी
जुनी सांगवी : आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चांगल्या फलंदाजीने या सत्रात कामगिरी करून चेन्नई सुपर किंग्ज चा शैलीदार फलंदाज व पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवीकर ऋतुराज गायकवाड याच्या धडाकेबाज कामगिरी बद्दल सांगवीकरांनी फटाके फोडून व पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.मधुबन सोसायटी येथे राहणार्या ऋतुराज ने आपल्या शैलीदार फलंदाजीने क्रिकेट वर्तुळात स्वताचा ठसा उमटवला आहे.
जुलै महिन्यात ऋतुराजने वन डे व टी 20 सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघात श्रीलंका दौऱ्यात त्याची निवड झाली होती. पिंपरी चिंचवड शहरामधून भारतीय संघात देशाचे प्रतिनिधित्व करणारा ऋतुराज पिंपरी चिंचवडचा पहिला खेळाडू आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्‍यातील पारगाव नेमाने हे ऋतुराजचे मुळगाव वडील नुकतेच लष्कर सेवेतून वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेले तर आई शिक्षिका व गृहिणी आहे. या हंगामात त्याने चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळताना सर्वाधिक ६३५ धावा करून ऑरेज कॅपचा मानकरी ठरला आहे.
मधुबन जुनी सांगवीच्या मातीत वाढलेल्या मराठमोळ्या खेळाडूवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून आपल्या भारदस्त रेखीव खेळाने क्रिकेट जगतातील तमाम क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधणाऱ्या जुनी सांगवी च्या सुपुत्राने भारतीय संघातही स्थान मिळवलेले आहे.त्याने पिंपरी चिंचवडच्या दिलीप वेंगसरकर अकादमीमधून क्रिकेटचे धडे घेतले आहेत.


Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here