प्रतिनिधी: देवा कदम
करमाळा: देशात कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे या सर्व गोष्टींना प्रतिबंध म्हणून शासनाने विद्यार्थ्यांना लसीकरण मोहीम हाती घेतलेली होती आणि याच मोहिमेचा एक भाग म्हणून उमरड ता.करमाळा जि.सोलापुर या ठिकाणी मा.वामनराव बदे माध्य व उच्च माध्य विद्यालयात आज लसिकरण कँम्प आयोजित करण्यात आला होता.या लसिकरण कँम्पमध्ये 15 ते 18 या वयोगटातील सर्व मुलामुलींना लसिकरण देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात व व्यायामा संदर्भात माहिती देऊन त्याचे महत्त्व देखील सांगण्यात आले.गावचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली लसीकरण कॅम्प व्यवस्थित संपन्न झाला.
या वेळी गावचे ज्येष्ठ नेते मा.वामनदादा बदे,मा.सरपंच राजश्री बापु चोरमले,उप.सरपंच.अन्नपुर्ना संदिप बदे यांच्या ऊपस्थितीत हा कँम्प संपन्न झाला.यावेळी या कॉलेजचे मुख्याध्यापक कोठावळे सर व सर्व स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते.