माळेगाव देणार 2780 रुपये एकरकमी एफआरपी. छत्रपती देनार 2515 .

माळेगाव साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने चालू गळीत हंगामातील गाळपास येणाऱ्या उसासाठी एक रकमी 2780 रुपये प्रति टन एफ आर पी देण्याचा निर्णय घेतला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने या वर्षीच्या गळीत हंगामात गाळप असणाऱ्या वर्षासाठी कारखान्याच्या असलेल्या संपूर्ण एफ आर पी च्या एक रकमी हप्ता देण्याचा निर्णय घेतला. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे उपाध्यक्ष बन्सीलाल आटोळे कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला,तर दुसरीकडे छत्रपती सहकारी साखर कारखान्याने या वर्षीच्या 2515 रुपये प्रति टन एफ आर पी पैकी 2200 रुपये प्रति टन चा हप्ता सभासदांच्या खात्यात जमा केला आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने मात्र एफआरपी एक रकमी न देता मागील वर्षाप्रमाणेच हप्त्याहप्त्याने देण्याचा निर्णय घेतला आहे.कारखान्यांने 2200 रुपयांचा हप्ता जाहीर केल्यानंतर शेतकरी कृती समितीचे सदस्य सतीश काटे यांनी एक प्रसिद्धी पत्रक देऊन एक रकमी एफआरपी देण्याची मागणी केली आहे. कारखान्याने ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याच्या कालावधीत आलेल्या उसासाठी प्रतिटन 2200 रुपये प्रमाणे 25 कोटी 48 लाख रुपये सभासदांच्या बँक खात्यात जमा केले आहे. सर्व शेतकरी वर्गांचे इतर कारखान्यांच्या दराकडे लक्ष लागून राहिले आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here