माळेगाव कारखान्याने ऊस दराबरोबरच कामगारांचा बोनसही राज्यांत एक नंबरचा व उच्चांकी देऊ अशी घोषणा करणे कामगारांना अपेक्षित होते- राजेंद्र तावरे .

साखर कामगार व ऊस उत्पादक सभासद हे साखर उद्योगातील गाडीची दोन चाके आहेत असे नेहमीचं बोललं जातं मात्र कृतीतून साखर कामगारांना नेहमी दुय्यमच वागणुक दिली जाते अशी धारणा कामगार वर्गाची झालेली आहे वास्तविक राज्यातील सहकारी साखर कारखान्याच्या तुलनेत एक नंबरचा व उच्चांकी म्हणजेच 3411 /- रुपये शेतकरी सभासदांना ऊस दराची घोषणा करण्यात आली त्यावेळीच साखर कामगारांनाही राज्यातील सहकारी साखर कारखानदारी मधील एक नंबरचा व उच्चांकी बोनस देण्यात येईल अशी किमान घोषणा तरी करणे कामगारांना अपेक्षित होते परंतु कामगारांच्या बोनस बाबतीत व इतर प्रलंबित प्रश्नावर अद्याप कोणतीही भुमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.दुसऱ्या बाजूला गौरी – गणपती उत्सवात कामगारांच्या शिल्लक रजेचा पगार देणेत येतो त्याचाही अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
तिसऱ्या बाजूला शासनाने गठीत केलेल्या त्रिपक्षीय समितीने केलेल्या वेतन मंडळाच्या कराराची मुदत संपत आलेली आहे तरी त्याचा अद्याप करारही करण्यात आला नाही व पन्नास टक्के फरकाची रक्कम ही देण्यात आली नाही व कामगार संघटने मध्ये वाद निर्माण करुन संघटनेची किमान ( अंदाजे ) एक कोटी रुपये देय्य रक्कमही कारखाना प्रशासन गेली अनेक वर्षे बिगर व्याजी वापरत आहे.
चौथ्या बाजूला कामगारांची मेडीक्लेम पॉलिसी उतरवण्या बाबत सर्वच कामगार प्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घेऊन व माळेगाव कारखान्याचे संचालक मंडळाने मान्यता देऊन , पहीली मेडिक्लेम पॉलिसी संपुष्टात येऊन दोन महिने झाले तरी मेडीक्लेम पॉलिसी नक्की कोणत्या व्यक्तीला , कंपनीला , देण्यात यावी या साठी अद्याप मेडिक्लेम पाॅलीसी झालेली नाही.पाचव्या बाजूला हंगामी व कायम कामगारांची हुद्देवारी , बढती करून रोजंदारीवर आपणंच लावलेल्या कामगारांना तुटपुंज्या तिनशे रुपये पगारावर काम करण्यासाठी भाग पाडत आहात , आज विचार केला तर शेतात काम करणाऱ्या मजुरांना तिनशे रुपये पेक्षा जास्त रोजंदारी दिली जाते मात्र तुम्हीचं कामावर लावलेल्या उच्च शिक्षित मुलांना तीनशे रुपये रोजंदारीवर काम करुन घेता हि बाब योग्य नाही कामगार कायद्याचे उल्लंघन करणारी आहे .साखर आयुक्त , सहकार मंत्री , उच्च न्यायालयात जाऊन कायदेशिर बाबतीत काही ज्ञान्त अज्ञात लोकांनी काही अडचणी निर्माण केलेल्या आहेत याची आम्हाला पूर्ण जाणीव नक्कीच आहे परंतु त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन
तुम्हाला आमच्या बारामती तालुका साखर कामगार सभा या संघटनेच्या ( कै.साथी किशोर पवार , श्री तात्यासाहेब काळे गटातील संघटनेच्या) माध्यमातून पाहिजे ती मदत आजवर करत आलेलो आहोत कारण आमची संघटना ही आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब व आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना मानणारी आहे आणि माळेगाव कारखान्याचे संचालक मंडळ हे सुद्धा यांच्या नेतृत्वाखाली निवडुन आलेले आहे त्यामुळे या पुढेही संघटनेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करु अशी ग्वाही वारंवार आम्ही देत आलेलो आहोत. शिवाय या सर्व बाबी आमच्या संघटनेच्या कायदे सल्लागारांच्या मार्गदर्शन घेऊन कायद्याचे चौकटीत बसवून देण्यासाठी सुध्दा कटीबद्ध असल्याची ग्वाहीही देताना एक आग्रही मागणी करतो की माळेगाव कारखान्याच्या प्रचलित पद्धती प्रमाणे येणाऱ्या हंगामात कायदेशीर बाबींची पूर्तता होई पर्यंत रोजंदारीवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून त्वरित किमान वेतन ( समान काम समान न्याय ) देण्यात यावे ही आमची आग्रही व प्रामुख्याने मागणी आहे.वरील सर्व मागण्या माळेगाव कारखान्याच्या कामगारांच्या अत्यंत गरजेच्या व गंभीर बाबी आहेत आम्ही आजवर नेहमीचं माळेगाव कारखान्याच्या चेअरमन , व्हाईस चेअरमन , संचालक मंडळाचा मान सन्मान राखत राज्यांत माळेगाव कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाचा नावलौकिक कसा वाढेल , व्यवस्थापन व कामगार यांच्या मध्ये कसे सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतील यासाठी नेहमीचं प्रयत्न करत आलेलो आहोत या पुढेही असेच काम राहुन हे अजून कामगार – व्यवस्थापन यांच्यातील संबंध कसे दृढ व चांगले होतील या साठी प्रयत्नशील राहु. माळेगाव कारखान्याचे भविष्यातील चेअरमन , व्हाईस चेअरमन , संचालक कोणत्याही गटा तटाचे असले तरी ते आम्हां कामगार बांधवांना आदरणीय वंदणीयच असेल त्यामुळे नव्याने होऊ पाहणाऱ्या भावी चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांना सर्व कामगारांच्या व बारामती तालुका साखर कामगार सभा ( कै. साथी किशोर पवार , श्री तात्यासाहेब काळे गट ) या संघटनेच्या वतीने अगोदरच शुभेच्छा देऊन भावी चेअरमन , व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाला परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की या पुढील काळात कामगार प्रश्न सोडविण्यासाठी या भावी चेअरमन , व्हाईस चेअरमन व संचालकांना ताकद देऊन कामगारांचे वरील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना……
राजेंद्र शिवाजीराव तावरे – पाटील.
अध्यक्ष – बारामती तालुका साखर कामगार सभा.
मो.नं.9921200911.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here