माळी सेवा संघ संघटनेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात मध्ये साजरा..
पुणे:माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचा प्रथम वर्धापन दिवस व कै. पारूबाई बबन बोराटे यांच्या स्मरणार्थ सन्मान पुरस्कार सोहळा यानिमित्ताने प्रथम संत सावता महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन ह. भ .प. रमेश महाराज वसेकर, आधारस्तंभ व सौ रुपाली ताई चाकणकर, मा.महपौर वैशाली घोडेकर, संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ माळी ,उपाध्यक्ष बालाजी माळी, सचिव सचिन राऊत, उपाध्यक्ष ज्ञानदेव जाधव , बालाजी वहिल,ॲड. नितीन राजगुरू ,महेश भाऊ गोरे, मुरलीधर भुजबळ, सौ उर्मिला ताई भुजबळ, तसेच प्रमुख सत्कारमूर्ती व मान्यवर संघटनेचे कार्यकारणी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संत सावता महाराजांची आरती करण्यात त्यानंतर प्रमुख पाहुणे यांचे व मान्यवरांच्या भाषण झाले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बापूसाहेब बोराटे यांनी केलं. आपल्या भाषणामध्ये म्हणाले की माळी संघटनेचे महाराष्ट्र मध्ये काम चांगल्या पद्धतीने चालू आहे खरेतर संघटनेची व्याप्ती बारा जिल्ह्यामध्ये आहे ,संघटनेचे ध्येय एकच आहे. तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांना न्याय मिळवून हेच संघटनेचे ध्येय आहे.यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष बालाजी माळी यांनी आपल्या भाषणामध्ये संघटनेच्या कार्याचा आत्तापर्यंत केलेल्या कामाचा उल्लेख करण्यात आला. पुढे बोलताना म्हणाले की संघटनेमध्ये लहान आणि मोठा असा कधीही भेदभाव केला जात नाही. सर्वांना समान न्याय दिला जातो. त्यामुळे आमच्या संघटनेचे काम प्रत्येक जिल्ह्यामध्ये ,तालुक्यामध्ये, गावांमध्ये पोहोचत आहे. त्यानंतर ज्ञानदेव जाधव उपाध्यक्ष यांचेही भाषण झालं यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये करून समाज बांधवांना न्याय मिळवून देत आहोत.,लिगल सेल चे अध्यक्ष नितीन राजगुरू साहेब आपल्या भाषणामध्ये म्हणाले तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून होत आहे. संघटनेच्या महिला उपाध्यक्ष उर्मिला ताई भुजबळ आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की रूपालीताईंच डोळ्यापुढे आदर्श ठेवून महिलांना सक्षमीकरण करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करत आहोत.माळी सेवा संघ संघटनेचे अध्यक्ष दत्ता भाऊ म्हणाले की एक ध्येय होतं विखुरलेल्या समाजातील लोकांना एकत्र आणून संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवुन काम करायचं. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाचा जागर सुरू केला. त्यातुन शिक्षित झालेल्या महिला आज सर्वच क्षेत्रांमध्ये स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. वर्षानुवर्षे अन्याय-अत्याचार सहन करत स्वतःच्या अस्तित्वाची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत असलेल्या समाजबांधवांना सहकार्याचा हात देता यावा यासाठी “माळी सेवा संघाची” स्थापना करण्याचा मानस होता.पुण्यात एक रोपटे लावले होते.त्याच्या वट रुक्ष झाल्याचा पाहावयास मिळत आहे. त्यानुसार राज्यभर विविध क्षेत्रांमधील समाजबांधवांना एकत्र करुन त्यांनी वर्षभरामध्ये चांगले संघटन उभे केले आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे भविष्यामध्ये होतील याची मला खात्री आहे.
आज पुणे येथील आण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल या समारंभामध्ये सन्मान करण्यात आला. त्या म्हणाल्या की,कार्यक्रमाच्या निमित्ताने “माळी सेवा संघाच्या” राज्यभरातून उपस्थित असलेल्या पदाधिकार्यांबरोबर संवाद साधता आला याचा मनस्वी आनंद झाला.खरेतर कौतुक करावं तेवढं थोडंच आहे .कारण जे मी करू शकले नाही ते दत्ताभाऊ यांनी केलं. कारण माळी सेवा संघ संघटनेचा वर्धापन दिवस आणि वर्धापन दिनानिमित्त माझ्या आईचे स्मरणार्थ सन्मान पुरस्कार सोहळा, खरंच रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती जवळची असतात. हे तर मला आज दत्ता भाऊंचा कार्यामुळे जाणवलं, खरंतर मी ज्या पक्षामध्ये काम करते एवढी माझी कार्यकारणी नाही परंतु, माळी सेवा संघ संघटनेची कार्यकारी एवढी आहे की पत्रिकेमध्ये नावे लिहायला जागा शिल्लक नाही.दत्ताभाऊ नि संघटन केलं. खरंच कौतुकास्पद.यावेळी ओबीसी आरक्षणाविषयी ताईसाहेब म्हणाल्या की आपल्याला शांत बसून कुठलीही गोष्ट मिळत नसेल तर त्यासाठी आवाज उठवला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. सर्व समाज बांधवांनी आवाज उठवला पाहिजे, एकत्रित आले पाहिजे.खरंतर संघटनेचे कामाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण मी महाराष्ट्र मध्ये दौऱ्यावर असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आले असताना संघटनेच्यावतीने सत्कार, स्वागत केल जाते.
यावेळी संत शिरोमणी सावता महाराजांचे 16 वे वंशज ह भ प रमेश महाराज वसेकर समाज बांधवांना मार्गदर्शन करीत असताना म्हणाले की जो कोणी आपल्याला नाव ठेवते त्याच्याकडे लक्ष न देता पण समाजाचे काम करत राहायचं. कारण या समाजामध्ये चांगले करणारा त्रास होतोय. कारण माळी सेवा संघ संघटनेचे काम महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट पद्धतीच आहे कारण एका वर्षांमध्ये दत्ताभाऊ नि संघटन मोठ्या प्रमाणात केलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटनेच्या पदाधिकारी आहे आपल्या संघटनेचा असाच नावलौकिक व्हावा हीच सावता महाराजांची प्रार्थना करतो.
यावेळी माळी सेवा संघाच्या आधारस्तंभ व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर,पि.चि.महा.पालिका मा. महापौर सौ. डॉ. वैशाली घोडेकर,ह.भ.प.रमेश महाराज वसेकर, गौररमुर्ती.बबन बोराटे, माळी सेवा संघ संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय माळी,डि.वाय.एस.पी.अर्चना फुलसुदंर, काशिनाथ तळेकर, राजेंद्र गिरमे, पोपटराव बोराटे, गोविंदराव शिरवाडकर, डॉ.नितिन शिंदे,त्रृतुराज गायकवाड चे वडील, दशरथ कुळधरण, अर्जुन गरूड, विकास अभंग, सतिशशेट खुणे,सचिन अनंतकवळस, संदीप फुलसुंदर, संतोष शिंदे, ज्ञानदेव शेंडे, डॉ.उत्तमराव जाधव, पल्लवी भागवत,अनिता शिंदे,रवि माळी, ममता शिंदे अनिता राऊत, रमेश गणगे, शकुंतला शिंदे, सचिन गायकवाड, पुष्पा कुदळे, कल्पेश पाटील, सौ. शामा जाधव, प्रभा करपे, मीनाक्षीताई बोराटे, रामा भोसले, तसेच माळी सेवा संघ प्रदेश, विभागीय, जिल्हा, तालुका, शहर,व ग्रामीण भागातील पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित मान्यवर व महाराष्ट्रातून उपस्थित राहिलेले संघटनेचे पदाधिकारी यांचे आभार नानासाहेब ननवरे यांनी मानले. 