इंदापूर || इंदापूर तालुक्यातील बाभुळगावचे सामाजिक कार्यकर्ता व M9मराठी न्युज चे संपादक प्राध्यापक भगवान मोरे सर यांची मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.
शनिवार दिनांक 28 मे रोजी पुणे या ठिकाणी मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य संघटनेच्या राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्ते यांची निर्धार बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संघटनेच्या महाराष्ट्रातील विविध भागातील व विविध पदासाठी नियुक्त्या करण्यात आल्या.
मातंग एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे व राज्य कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे यांच्या यांच्या हस्ते पुणे येथील संघटनेच्या निर्धार बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी भगवान मोरे सर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.मातंग एकता आंदोलन संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून. मातंग समाजामध्ये शैक्षणिक क्रांती घडवून आणे हेच ध्येय असून, व्यसनाला व अंधश्रद्धा ला बळी पडणाऱ्या लोकांमध्ये जागृती घडवून आणणे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश दादा बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये संघटना आणखीन व्यापक व मजबूत करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित सरचिटणीस भगवान मोरे सर यांनी दिली.
यावेळी संघटनेचे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी , जिल्हाध्यक्ष , तालुका अध्यक्ष व संघटनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Home Uncategorized मातंग एकता आंदोलन संघटनेच्या “महाराष्ट्र राज्य सरचिटणीस” पदी भगवान मोरे सर यांची...