माझ्या बळीराजाच्या जीवनात समृद्धी लाभु दे…माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे श्री लक्ष्मी नृसिंह चरणी साकडे.

श्री लक्ष्मी नृसिंह जयंतीच्या निमित्ताने माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज निरा नरसिंहपूर येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नृसिंह चरणी लीन होत दर्शन घेतले.
निरा-भिमा नदीच्या संगमावर वसलेले हे मंदिर अतिशय पुरातन असुन विविध पुराना मध्ये या मंदिराचे वेगवेगळे दाखले आपणांस पहावयास मिळतात.लक्ष्मी नृसिंह देवस्थानचे महात्म्य इंदापूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर परिचीत आहे.त्यामुळे एक प्रसिद्ध तिर्थक्षेत्र म्हणून या देवस्थानची ओळख असल्याने दरवर्षी लाखो भाविक याठिकाणी नतमस्तक होत असतात.
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे आपल्या प्रत्येक राजकीय निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ याच मंदिरात नारळ वाढवून करत असतात.तसेच त्यांनी आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये विशेष बाब म्हणून कोट्यावधी रूपयांचा निधी मंजूर करून याठिकाणी अतिशय उत्तम सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. त्यामुळे आमदार भरणे व लक्ष्मी नृसिंह देवस्थानचे विशेष जिव्हाळ्याचे संबंध आहेत.जयंतीनिमित्त आज आमदार भरणे यांनी लक्ष्मी नृसिंहाची विविधत पुजा करून दर्शन घेतले.या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की,सध्या आमुचा शेतकरी बांधव चोहोबाजूंनी अडचणीत आला आहे.कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटे बळीराजाच्या पाचवीला पुजली आहेत.विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी सध्या ना उमेद झाला आहे.
त्यामुळे यंदा पाऊस-पाणी चांगला पडून माझ्या बळीराजाचे शेत-शिवार पुन्हा एकदा भरभरून पिकु दे तसेच शेतमालाला चांगला भाव मिळून शेतकरी बांधवांच्या जिवनात समृद्धी येऊ दे अशा प्रकारचे साकडे आमदार भरणे यांनी श्री लक्ष्मी नृसिंह चरणी घातले.
यावेळी देवस्थानच्या वतीने आमदार भरणे यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास जेष्ठ नेते श्रीकांत दंडवते,नरसिंहपूरचे सरपंच चंद्रकांत सरवदे,पिंपरीचे सरपंच श्रीकांत बोडके,नरहरी काळे,विठ्ठल देशमुख,अरूण क्षिरसागर,अविनाश कोळी,गणेश काकडे,आनंद काकडे,कदम वस्ताद,दशरथ राऊत,महेश राऊत,नितीन सरवदे,समाधान सरवदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here