“माझं इंदापूरच्या पवारसाहेबांवर बारीक लक्ष आहे”- वाचा इंदापूरच्या ‘पकाचा चहा’ सेंटर मधील भरणे मामांचा गमतीशीर किस्सा.

इंदापूर:माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे आज पतंजली योग समितीमार्फत घेतलेल्या योग शिबिरात सहभाग घेतल्यानंतर पकाच्या चहाच्या सेंटरवर चहाचा आस्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आले होते.सकाळी साधारण ७.३० वाजता रोजच्याप्रमाणे तेथे मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य सुद्धा उपस्थित होते.चहा घेत मामा व मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्यांच्या गप्पा खूप रंगल्या होत्या. त्यातच मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य व महाराष्ट्राच्या कृषी विभागात कार्यरत असणारे इंदापूरचे रहिवासी शरद पवार यांचं आगमन झालं आणि मामांनी त्यांना बसण्यासाठी जागा करून दिली.“माझं इंदापूरच्या शरद पवार साहेबांवर खूप बारीक लक्ष आहे,त्यांचंही मामांवर प्रेम आहे पण मी परवा विधानसभेतून त्यांना फोन करत होतो पण तो लागला नाही म्हणून मला शुभेच्छा देता आल्या नाहीत. त्यामुळे माझ्याबद्दल पवार साहेबांनी गैरसमज करून घेऊ नये नाहीतर माझं काय खरं नाही बाबांनो..!” असा मामांनी डायलॉग मारल्यावर सर्वांनी मामांच्या या डायलॉगचे हसून आणि टाळ्यांनी दाद दिली.खरंतर परवाच इंदापूरच्या या शरद पवारांचा वाढदिवस होता. आणि नेहमीप्रमाणे दत्ता मामा भरणे इंदापूर तालुक्यातील शक्य तेवढ्या लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतः फोन करत असतात. परवा त्यांनी इंदापूरच्या या शरद पवारांना फोन केल्यानंतर त्यांचा फोन बंद लागला होता त्यामुळे त्यांनी हा डायलॉग मारला. योगायोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व देशाचे नेते शरद पवार यांचं नाव व इंदापूरच्या कृषी विभागात कार्यरत असणाऱ्या या शरद पवार यांचं नाव एकच असल्याने हा गमतीशीर किस्सा आज पाहायला मिळाला.
एवढेच नाही तर त्यांनी त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले व त्यांनी इंदापूरच्या या शरद पवारांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला सत्कार संपल्यानंतर “पवार साहेब इंदापूरच्या या आपल्या मामांवर लक्ष असू द्या व तुमचा आशीर्वाद असाच लाभू द्या” असेही मामा म्हणायला विसरले नाहीत.
धकाधकीच्या दिनक्रमातून वेळ काढून पकाच्या चहा सेंटरवर तब्बल एक तास निवांतपणे भरणे मामा सर्वांशी आपुलकीने गप्पागोष्टी करताना दिसले.यावेळी उपनगराध्यक्ष अरविंदतात्या वाघ यांनीही सर्व उपस्थितांना कोपरखळ्या मारल्या. या गप्पागोष्टी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर,अरविंदतात्या वाघ,नगरसेवक वसंतराव माळुंजकर,नगरसेवक पोपट शिंदे हेही उपस्थित होते. या गप्पागोष्टी मध्ये भरणे मामांनी विधानसभेतील काही किस्से सांगितले हे किस्से ऐकल्यानंतर मॉर्निंग वॉकच्या या सदस्यांनी “आम्हाला विधानसभा बघायची आहे तुम्ही आम्हाला विधानसभा दाखवा”अशी ही विनंती केली आणि ती विनंती सुद्धा भरणे मामांनी मान्य केली.
एकंदरीतच आज भरणे मामा यांनी गप्पागोष्टी मारत व डायलॉग बाजी करत उपस्थित मॉर्निंग वॉक सदस्य व इतरही उपस्थित लोकांची मने त्यांनी जिंकली असे म्हणता येईल.
आजच्या झालेल्या या गप्पागोष्टी मध्ये तुकाराम बानकर,सचिन महाजन गिरीष भिसे,महेश पाटील,नदीम बागवान,मिलिंद कौलगी,प्रसाद चिंचकर,सतिश तारगावकर,विकास खिलारे,कुशल कोकाटे,शरद पवार,कैलास नरुटे,उत्तम माळुजकर,विनय थोरात इत्यादी सदस्य उपस्थित होते.


“प्रकाश तुझ्या चहाची टेस्ट खूप मस्त आहे” असे म्हणत प्रकाश खांबसवडकर चे भरणेमामा यांनी  कौतुक केले. यावेळी प्रकाशने ‘पकाचा चहा’ नावाच्या चहा पावडरचे प्रॉडक्ट मामांना दाखवले व मामांनी ते स्वतः मी उद्यापासून या चहा पावडरचा चहा पिणार असं म्हणत प्रकाशला प्रोत्साहन दिले.


Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here