आज राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील साहेब यांचा साठावा वाढदिवस तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जात आहे. इंदापूर शहरामध्ये हर्षवर्धनपाटील यांच्या कट्टर समर्थकांनी हर्षवर्धन पाटील यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी ग्रामदैवत इंद्रेश्वरास अभिषेक घातला व दीर्घायुष्य लाभासाठी प्रार्थनाही केली.तालुक्यात वेगवेगळ्या भागांमध्ये सामाजिक उपक्रम राबवून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. तालुक्यातील विविध शाळा संस्था कारखाने इत्यादी ठिकाणी वृक्षारोपण व रक्तदान शिबिर ही चालू आहेत.
आज इंद्रेश्वर सकाळी दीर्घायुष्यकरिता अभिषेक घालण्यासाठी इंदापूर अर्बनचे संचालक अविनाश नाना कोथमिरे, दादासाहेब पिसे, राकेश शुक्ला, सामाजिक कार्यकर्ते हमीद भाई आतार,व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर गानबोटे, योगेश कांबळे, महादेव चव्हाण सर,देवराज देशमुख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकंदरीतच आज तालुक्यामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने एक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Home Uncategorized माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दीर्घायुष्य लाभण्याकरता समर्थकांनी केला ग्रामदैवत इंद्रेश्वरास अभिषेक.