इंदापूर: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा निरोप घेऊन आलो आहे “भाटनिमगाव” येथील शेखफरीद साहेब यात्रेनिमित्त भरवण्यात येणाऱ्या कुस्ती आखाड्याला दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले, यात्रेनिमित्ताने राजवर्धन पाटील हे भाटनिमगाव येथील शेखफरीद बाबा यांच्या दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांनी कुस्ती आखाड्याला भेट देऊन त्यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली.
भाटनिमगाव येथील शेखफरीद साहेब ग्रामदैवत हे जागृत देवस्थान म्हणून परिसरात परिचित आहे, तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत संदल छबीना तमाशा व कुस्ती आखाड्याचे आयोजन केले जाते परिसरातील भाविक मोठ्या भक्ती भावाने यात्रेत सहभागी होत असतात.यापूर्वी दर्गा बांधकामासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य अंकिता पाटील- ठाकरे यांच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, कुस्ती आखाड्यासाठीही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून दहा लाख रुपये देण्याची घोषणा राजवर्धन पाटील यांनी केली.
यावेळी पंच कमिटीच्या वतीने सरपंच अजित खबाले यांनी राजवर्धन पाटील यांचा सत्कार केला.
Home Uncategorized माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा निरोप घेऊन आलो आहे,’भाटनिमगाव’ येथील शेखफरीद साहेब...