हर्षवर्धन पाटील यांनी पूर्ण केला शिवप्रेमी युवकांचा आग्रह……
इंदापूर: प्रतिनिधी दि.20 फेब्रु.22
बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम संपून माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे शनिवारी (दि.19) लगबगीने पुढील शिवजयंती कार्यक्रमाला जाणेसाठी गाडीकडे निघाले होते. इंदापूर तालुक्यातील सुमारे 35 शिवजयंती कार्यक्रमांना हर्षवर्धन पाटील यांना भेटी द्यायच्या होत्या, त्यामुळे ते गडबडीत होते. त्याच वेळी काही शिवप्रेमी युवक हर्षवर्धन पाटील यांचेजवळ आले व शिवजयंती उत्सवानिमित्त मंडपाच्या बाजूला, आलेल्या नागरिकांचे आदरतिथ्य करणेसाठी ठेवलेले शीतपेय घेणेसाठी येण्याचा आग्रह केला. शिवप्रेमी युवकांचा हा आग्रह तात्काळ मान्य करीत, हर्षवर्धन पाटील हे शीतपेय ठेवलेल्या स्टॉल जवळ आले व शीतपेयाचा आस्वाद घेत युवकांची विचारपूसही केली. यावेळी कामधेनू सेवा परिवाराचे अध्यक्ष, समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे, आखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पवनराजे घोगरे व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.