माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर अर्बन बँक येत्या काळात पुणे जिल्ह्यातील अग्रेसर बँक म्हणून नावलौकिक कमवेल- चेअरमन देवराज जाधव

– हर्षवर्धनजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुख-समृद्धी दाम दुप्पट योजनेचा शुभारंभ.
– भव्य रक्तदान शिबिर संपन्न.
– केक कापून उत्साहाच्या वातावरणात दोन्ही कार्यक्रम पार पडले.
इंदापूर:काल इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यामध्ये ठीक ठिकाणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम पार पडले होते. इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ओळख असलेले व इंदापूर अर्बन बँकेचे संस्थापक मार्गदर्शक हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदापूर अर्बन बँकेने सर्व सभासद आणि नागरिकांसाठी सुख-समृद्धी दाम दुप्पट ठेव योजना चालू केली असून या सुख-समृद्धी दाम दुप्पट ठेव योजनेचा शुभारंभ बँकेचे कार्यतत्पर चेअरमन देवराज जाधव यांच्या शुभहस्ते आज 21 ऑगस्ट 2023 रोजी बँकेच्या सभागृहात पार पडला. त्याचबरोबर वाढदिवसाचे औचित्य साधून इंदापूर अर्बन बँकेमध्ये भव्य असे रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आले होते.यावेळी बँकेचे चेअरमन देवराज जाधव यांनी या सुख समृद्धी दाम दुप्पट योजनेची माहिती देताना सांगितले की,”ही योजना सर्वसामान्य ग्राहकांसाठी अगदी फायदेशीर असून सर्व ग्राहकांना त्यांची ठेव रक्कम आठ वर्षांत दाम दुप्पट करून मिळेल तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी साडेसात वर्षात दम दुप्पट करून मिळेल तरी बँकेच्या सर्व सभासद हितचिंतक आणि ग्राहकांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा त्याचबरोबर बँकेकडील ठेवी रकमेला पाच लाखापर्यंत भारतीय रिझर्व बँकेचे गॅरंटी कव्हर आहे त्यामुळे ग्राहकांनी बँकेवर विश्वास ठेवून आपला आर्थिक लाभ करून घ्यावा असे बँकेचे चेअरमन देवराज जाधव यांनी आवाहन केले.सध्याच्या स्थितीत बँकेची आर्थिक उन्नती चांगली असून एनपीएचे प्रमाणही पूर्णपणे नियंत्रणात आलेले आहे. सध्या इंदापूर तालुक्यात नावलौकिक कमावलेल्या या बँकेला आमचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील अग्रेसर बँक म्हणून ओळखली जाईल असा विश्वास बँकेचे चेअरमन देवराज जाधव यांनी व्यक्त केला. बँकेच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी सर्व संचालक हे प्रयत्नशील राहत आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या योजनांद्वारे कर्जदार आणि ठेवीदारांना कसा फायदा मिळेल हे सुद्धा पाहिले जात आहे संपूर्ण बँकेवर आमचे हर्षवर्धन पाटील यांचे नियंत्रण व मार्गदर्शक असल्याने येणाऱ्या काळात पुणे जिल्ह्यामध्ये अग्रेसर बँक म्हणून इंदापूर बँकेची ओळख असेल” असे चेअरमन देवराज जाधव यांनी सुख समृद्धी दाम दुप्पट योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमा वेळी बोलताना सांगितले.या ठेवी योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर इंदापूर अर्बन बँकेकडून भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरासही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.बँकेचे चेअरमन देवराज जाधव, व्हाईस चेअरमन सत्यशील पाटील, त्याचबरोबर बँकेच्या संचालकांपैकी संदीप गुळवे, विकास देवकर, लालासो सपकाळ, भागवत(दादा) पिसे, अविनाश कोतमिरे, मच्छिंद्र शेटे, गोविंद रणवरे स्वप्नील सावंत, विकास मोरे, संजय जगताप,सुभाष बोंगाणे,डॉ. मिलिंद खाडे, संजय रायसोनी, डॉ.अश्विनी ठोंबरे, डॉ.दिपाली खबाले, विजय पांढरे, तानाजी निंबाळकर इत्यादी संचालक तर सागर गानबोटे, रणजीत भोंगळे, सचिन जामदार, अमित जंजाळ,एडवोकेट ऋषिकेश कोतमिरे उपस्थित होते.या कार्यक्रमास सर्व बँक स्टाफ उपस्थित होता यामध्ये बँकेचे सीईओ विजय तावरे,रवींद्र चव्हाण, माने साहेब, दिवसे साहेब,भाऊसाहेब शिंदे, जामदार साहेब, धायगुडे आप्पा, ज्योतीराम जामदार, औदुंबर कोकाटे, अण्णासाहेब चोपडे, सुहास वाघ, ज्ञानदेव डोंगरे, औदुंबर कचरे, रामभाऊ लोहार, अमोल मुळीक, महावीर वाघमोडे, मारुती कोकरे, आवलेश डोंगरे, युवराज सुरडकर, सुधाकर भगत, अमोल जाधव, अतुल राऊत,संतोष लोखंडे, दत्ता धावड, आबा कदम आणि मुक्ताई ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित राहून दाम दुप्पट ठेव योजना शुभारंभ व रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात हातभार लावला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे सीईओ विजय तावरे यांनी केले तर सूत्रसंचालन ज्योतीराम जामदार यांनी केले आभार बँकेचे व्हाईस चेअरमन सत्यशील पाटील यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here