महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री,विधान परिषद आमदार व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मा. महादेवजी जानकर यांचा वाढदिवस निमगाव केतकी येथे श्री संत सावता माळी चौक या ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी निमगाव केतकी येथील नागरिकांच्या वतीने फेटा बांधून तसेच केकला फाटा देत एकमेकांना द्राक्ष चारत अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्याचबरोबर त्याचप्रमाणे वन्य प्राण्यांसाठी कौठळी येथील गरुडा पाणवठ्यावर लखलखत्या उन्हामध्ये होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय लक्षात घेता टँकरच्या साह्याने पाणी सोडण्यात आले.
यावेळी सर्जेराव जाधव , संजय राऊत संदीप भोग, राजू भोंग, विजय पाटील, तुषार वडापुरे, तुषार शेंडे ,सागर ढगे, सुहास जाधव, राजु जठार ,गणेश घाडगे ,बाबू लोणकर, प्रवीण बारवकर, विकी जगताप, धनाजी राऊत, प्रताप हेगडे, तानाजी जगताप , त्याचप्रमाणे निमगाव केतकी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच इंदापूर तालुक्यातील सकाळचे पत्रकार मनोहर चांदणे, पुढारी व झी 24 तास चॅनलचे प्रतिनिधी जावेद भाई मुलाणी, लोकमतचे पत्रकार निलेश भोंग इत्यादी उपस्थित होते.
Home Uncategorized माजी मंत्री महादेवजी जानकर यांनी मुक्या प्राण्यांना पिण्यासाठी पाणी सोडून केला वाढदिवस...