भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला आज मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतल्या वांद्र्यात कांबळी यांनी दारुच्या नशेत गाडी चालवत दुसऱ्या गाडीला टक्कर मारली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.मात्र आता नंतर त्यांना जामीन मिळाला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळी दारू पिऊन गाडी चालवत होता. त्यांच्याविरोधात एका व्यक्तीने तक्रार केली होती. तक्रारदाराचं म्हणणं होतं की नशेत कांबळी यांनी आपल्या गाडीला टक्कर मारली आहे. यानंतर वांद्रा पोलिसांनी त्यांना अटक केली होती. एएनआयच्या वृत्तानुसार, त्याने आपल्या सोसायटीच्या गेटलाही गाडी ठोकली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि नंतर जामीनही मिळाला. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.