महाराष्ट्रात सध्या गाजत असलेला विषय म्हणजेच साखर कारखानदारी व ऊस तोड वाहतूक समस्या यावर आतापर्यंत ऊस वाहतूक महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजु पाटील यांनी बरेच ठिकाणी मिटींग, मोर्चे काढून शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्न केले.यासाठी कराड ते सातारा पायी मोर्चा काढण्यात आला होता यात मोठ्या संख्येने ऊस तोडणी वाहतूकदार सामील झाले होते. मा. सहकार मंत्री अतुल सावे साहेबांनी मोर्चा स्थगित करून तात्काळ समस्यांबाबत मिटींग आयोजित करण्यात आली होती.आतापर्यंत संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी राज्य शासनाने व साखर आयुक्तांनी बोलावलेल्या प्रत्येक मिटींग साठी उपस्थित होते.श्री.राजु पाटील यांनी साखर कारखानदारी व ऊस तोडणी वाहतूक यांच्या समस्यांबाबत राज्य शासनास पर्याय ही सुचवले. पाटील यांनी संघटनेच्या माध्यमातून सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील मुकादमाकडुन फसवणूक झालेल्या ऊसतोड वाहतूक मालकांना एकत्रित करून गुन्हे दाखल करून घेण्यासाठी प्रयत्न करुन एकप्रकारे न्याय देण्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतला नाही. अहोरात्र सतत ऊस वाहतूकदार यांच्या अडचणीला धावुन जाणारे पाटील यांना मात्रा राज्य शासनाच्या ऊस नियंत्रण मंडळ समितीवर डावलण्यात आल्याने सर्व ऊसतोड वाहतूकदारांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकरी व साखर कारखाना यांच्या मधील दुवा आहे तो म्हणजे ऊस वाहतूकदार,त्या पदाधिकार्यांनाच डावलल्याने मोठा प्रश्न निर्माण होत आहे यात हित कोनाचे ?लवकरच प्रत्येक जिल्ह्यात राज्य शासनाच्या विरोधात तिर्व निषेध करून आंदोलन छेडण्यात येईल असे संघटनेचे अध्यक्ष श्री. राजु पाटील व सातारा जिल्हा अध्यक्ष मनोज कुमार साळुंखे यांनी सांगितले.
Home Uncategorized महाराष्ट्र राज्य ऊस दर नियंत्रण मंडळ निवड समितीमध्ये ऊस वाहतूकदार यांना डावलल्याने...