महाराष्ट्रात प्रथमच शिक्षकांच्या बाजूने समर्थन करणारे एकमेव नेते माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.वाचा सविस्तर..

आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत बोलतांना अनेक शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा मांडला होता. तसेच हे शिक्षक शहरात राहून खोटे कागदपत्रे दाखवून घरभाडे उचलत असल्याचा आरोप सुद्धा बंब यांनी केला होता आणि याच आरोपावरून महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. परंतु आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने याबाबत आपली प्रतिक्रिया किंवा शिक्षकांचे समर्थन केले नव्हते. पण परवा झालेल्या इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मार्गदर्शन करताना इंदापूरचे आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्रातून पहिल्यांदाच शिक्षकांच्या पाठीशी आहोत व त्यांना खंबीरपणे साथ देणार अशी भूमिका मांडली. महाराष्ट्रात शिंदे गट व बीजेपी यांची सत्ता आल्यानंतर बीजेपीच्या आ.प्रशांत बंब यांच्या विरोधात बोलण्याचे धाडस कोणत्याही राजकीय नेत्याने आत्तापर्यंत केले नव्हते परंतु भरणे मामा याबाबत शिक्षकांचे समर्थन करताना म्हणाले की,मुख्यालयात शिक्षकांनी राहावे हा शासन निर्णय जुना आहे. ज्या काळात दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती त्या काळात शिक्षकांनी मुख्यालयात राहिल्यास गुणवत्ता सुधारेल असे शासनाचे धोरण होते. परंतु बदलत्या काळानुसार या निर्णयात शिथिलता येत गेली, दळणवळणाची साधने उपलब्ध झाली असल्याने हा मुद्दा कालबाह्य झाला आहे. काही राजकीय व इतर क्षेत्रातील मंडळी शिक्षकांना वेठीस धरण्यासाठी या धोरणाची भिती दाखवित असल्याचे त्यांनी सांगितले. लवकर हा निर्णय रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.आणि याच भूमिकेमुळे इंदापूर तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून शिक्षकांची मने जिंकण्यास भरणे मामा यशस्वी झालेले दिसून येतात. आणि महाराष्ट्रात प्रथमच कोणत्यातरी राजकीय नेत्याने शिक्षकांचे समर्थन करणारे ते एकमेव नेते ठरले आहेत.त्यांचा साधेपणा व स्पष्ट भूूमिका शिक्षकांना आवडली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here