महाराष्ट्राची मराठमोळी अप्सरा माधुरी पवारचा लंडनमध्ये साडी तोरा , माधुरीच्या साडीतल्या सौंदर्याने पाडली भुरळ.

महाराष्ट्राची लाडकी मराठमोळी अप्सरा आली( फेम) विजेती, तुझ्यात जीव रंगला, देव माणूस अशा मोठ्या मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री व नृत्यांगना महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेली आपल्या सर्वांची लाडकी माधुरी पवार ती ” लंडन मिसळ ” या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण तिथे करत आहे. सुभाष घई यांच्या मुक्ता आर्टस ही संस्था या सिनेमाची प्रस्तुत करता आहे. रान बाजार या मराठी सिरीज मध्ये झळकलेली अभिनेत्री माधुरी पवार सध्या अनेक कलाकृतीमध्ये काम करत आहे. सोशल मीडिया वरती तिचा भरपूर चाहता वर्ग आहे. तिच्या दिलखेचक अदा चाहत्यांना घायाळ करत असतात .जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चे उपसंपादक संतोष तावरे यांनी थेट माधुरीशी संपर्क करून लंडनवारी बद्दल तिच्याकडून जाणून घेतले माधुरी म्हणते ,आयुष्यातली पहिली लंडनवारी जी माझ्या कलेमुळे मला घडली. कला ही देवाने दिलेली देणगी पण त्या देणगीच सोनं करता आलं तुम्हा सगळ्या प्रेक्षकांमुळे आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकामुळे त्यासाठी पहिल्यांदा तुमचे धन्यवाद. आपल्या कलेमुळे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची संधी मिळते आणि त्याच सोनं मी नक्कीच करेन आणि करत आहेच हे काम, जेव्हा तुमच्यासमोर येईल तेव्हा तुम्हाला आवडेल एवढी शास्वती मि नक्की देऊ शकते.फक्त तुमच्यापासून थोडं लांब आल्याची जाणीव होते कारण आठवण येते आपल्या घराची, फॅमिली, फ्रेंड्स आणि प्रेक्षकांची दोन्ही देशातल्या वेळेमध्ये फरक असल्यामुळे काॅरडिनेट करता येत नाही.  पण काळजी करू नका मी लवकरच परत येत आहे इथलं काम संपवून असे माधुरीने सांगितले पुढे ती म्हणाली सध्या लंडनमध्ये खूप थंडी आहे (7° to 8°C ) इथली माणसं गुडघ्यापर्यंत बूट, जॅकेट्स, ओव्हरकोट, स्कार्फ,कॅप असं घालून फिरतात. मी घरून येतानाच साडी घेऊन आले होते .मला इच्छा होती लंडनमध्ये मी साडी घालून फिरावं कारण साडी हा माझा सगळ्यात आवडीचा पोशाख आहे.एक दिवस ऑफ मिळाला, तेव्हा सगळ्यांचं ठरलं जरा लंडन फिरून येऊयात मी छान तयार होऊन साडी घालून खाली आले, तेव्हा सगळे शॉक “तू साडी घातलीयेस???” हा प्रश्न होता सगळ्यांचा, तेव्हा वाटलं अरे इथल्या लोकांना माझ्याकडे बघताना ऑकवर्ड, तर नाही वाटणार ना पण मग विचार केला मला भारी वाटतंय ना मग बास आणि इथल्या लोकांना कळावं एक मुलगी साडीमध्ये कशी दिसते आणि स्त्री ची सुंदरता साडीमध्ये कशी बहरते.माधुरी पुढे म्हणाली,”आम्ही विंडसर ला गेलो न झालं असं गेल्यापासून परत येईपर्यंत तेथील सगळी माणसं,लहान मुले माझ्याकडे प्रेमाने, कुतूहलाने आणि कौतुकाने बघत होते तेव्हा खूप स्पेशल फिल झालं जास्त स्पेशल, तेव्हा वाटलं काही लोकं यायचे आणि म्हणायचे,”कॅन आय टेक पिक्चर विद यु, यु आर लुकिंग साे बिऊटिफुल.”आणि विचारायचे हे काय आहे याने खूप सुंदर दिसताय तुम्ही. लंडनमध्ये माझी आवड मला जपता आली आणि इथल्या लोकांचा आनंद मला अनुभवता आला त्यांचा प्रतिसाद पाहून खूप छान वाटलं माधुरी पवारचा जन्म सातारा शहरात झाला आहे. तिने पुण्याच्या महाविद्यालयातून एमबीएची पदवी घेतली आहे. अगोदर पासूनच अभिनय व डान्सची आवड असलेला माधुरीला टिक टॉकमुळे अधिक लोकप्रियता मिळाली होती.  माधुरीचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. माधुरीने नृत्यासोबतच अभिनयाचे धडे देखील गिरवले होते. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून माधुरी पवार हिला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here