महात्मा फुले विद्यालय बिजवडी शाळेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

👉 महात्मा फुले विद्यालय बिजवडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.
बिजवडी: नुकतेच महात्मा फुले विद्यालय बिजवडी येथे संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले.हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महात्मा फुले विद्यालय बिजवडी शाळेमुळे दर्जेदार शिक्षण मिळत असून ही शाळा एक आदर्शवत शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या सुध्दा चांगली आहे.शिक्षण,सामाजिक जाणीव, क्रीडा या बद्दलचे दर्जेदार शिक्षण देऊन शाळेतील मुला मुलींना आदर्श विद्यार्थी बनवण्याचा आपण प्रयत्न करू.तसेच वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो त्यामुळे यापुढे दरवर्षी स्नेहसंमेलन आयोजित करावे.” असेही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले.या स्नेहसंमेलनामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.वैविध्यपूर्ण लोकगीते,पोवाडे ,सामाजिक संदेश देणारे गीत, शेतकरी नृत्य, लावणी अशा बहारदार गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक छगन नाना भोंगळे ,माजी संचालक मच्छिंद्र अण्णा अभंग, छगन बोराटे,बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच कोमल कचरे, माजी सरपंच रेशमा भिसे तसेच ग्रामपंचायत सदस्य देविदास यादव ,ग्रामपंचायत सदस्य शहाजी शिंदे ,बाळासाहेब भोंगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कमाल सय्यद व कर्मयोगी कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे व पंचक्रोशीतील बहुसंख्य पालक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here