महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दीन म्हणून संपूर्ण जगभर उत्साहात साजरा केला जातो.त्याचप्रमाणे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे महात्मा फुले विद्यालय बिजवडी येथे ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दीन म्हणून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री , भाजप नेते श्री. हर्षवर्धनजी पाटीलसाहेब यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. भोईटे सर यांनी मार्गद्शन केले तसेच कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. छगन भोंगळे, माजी संचालक श्री. अभंग साहेब यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी इंदापूर शहरातील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. वैशाली गोरे यांनी स्त्री भून हत्तेविषयी तर नेत्र रोगतज्ञ डॉ. भारती कुरूडकर यांनी नेत्र रोगा बाबत मार्गदर्शन केले तसेच बिजवडी ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर समता सरवदे यांनी मार्गदर्शन केले.पोलिस अधिकारी माधुरी लडकत व ॲड. पूजा पोंद कुले यांनी स्त्रियांना स्व: रक्षणासाठी कायदे विषयक माहिती दिली तर तेज ग्रुपच्या अध्यशा सौ. अनिताताई खरात यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच अंगणवाडी सेविका, महिला पालक या सर्व महिला वर्गाचा सत्कार व सन्मान विद्यालयाचे शिक्षक देवकर मॅडम, कचरे मॅडम, पडळकर मॅडम यांनी केला.तसेच विद्यालयाचे क्रिडा शिक्षक मोरे सर, देवकर सर, मेंगाल सर, माने सर यांनी देखील महिलांचा सत्कार केला. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. कमालभाई सय्यद, बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. कोमलताई कचरे , ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,अंगणवाडी सेविका यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सौ. झगडे मॅडम व आभार सौ.जाधव मॅडम यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.