मराठा महासंघाच्या तालुका महिलाध्यक्ष पदी डॉ.पद्मा खरड व भिगवण शहर महिलाध्यक्ष पदी सुचेता साळुंके यांची निवड.

अ.भा.मराठा महासंघाच्या इंदापूर तालुका महिलाध्यक्ष पदी भिगवण येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. पद्माताई खरड व भिगवण शहर महिलाध्यक्ष पदी भिगवण येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचेता साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. मराठा महासंघाच्या कार्यालयात झालेल्या एका विशेष बैठकीत पुणे जिल्हा महिलाध्यक्ष एड. प्रियंका काटे-देशमुख यांचेकडून आलेले या संदर्भातील पत्र पुणे जिल्हाध्यक्ष ॲड पांडुरंग जगताप यांनी सौ.खरड व सौ. साळुंके यांचेकडे सुपूर्त केले. इंदापूर तालुक्यात महासंघाच्या काही शाखा नव्याने स्थापन करण्यात येणार असून त्या शाखांच्या अध्यक्षांची नावे इंदापूर तालुकाध्यक्ष राजकुमार मस्कर यांची यावेळी जाहीर केली.त्यानुसार रविराज वाघ-तक्रारवाडी, राहुल ढवळे-मदनवाडी, अमोल सूर्यवंशी-डीकसळ, प्रमोद गलांडे-शेटफळ गढे, सागर बागल-पिंपळे व संतोष डोळे-कुंभारगाव यांची शाखाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.भिगवण शहरा अंतर्गत प्रभागानुसार शाखा स्थापन करण्यात येणार असून प्रभाग क्र. १ – शुभम चांदगुडे व वैभव रसाळ, प्रभाग क्र. २- अभिषेक लोहकरे व माऊली चव्हाण, प्रभाग क्र.३- अभिजित जगदाळे व अनिकेत जमदाडे, प्रभाग क्र. ४- नितीन थोरात व साहिल परकाळे, प्रभाग क्र. ५- अनिल काळे व अक्षय काळे तसेच प्रभाग क्र.६ करिता मिलिंद जगताप व विशाल काळे यांची अनुक्रमे प्रभाग शाखाध्यक्ष व शाखा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती भिगवण शहराध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी यावेळी दिली. मराठा महासंघाच्या अतुलनीय अशा कार्यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा सहभाग गरजेचा असून त्या दृष्टीने महिलांचे संघटन करून त्यांना या प्रवाहात आणण्याचे तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माध्यमातून महिलांना गृहउद्योग निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे मत डॉ. सौ.खरड व सौ. साळुंके यांनी आपल्या निवडीनंतर व्यक्त केले.या प्रसंगी महासंघाच्या भिगवण शाखेचे प्रमुख सल्लागार डॉ.माधवराव निंबाळकर, डॉ.जयप्रकाश खरड, डॉ. अजय थोरात,बाळासाहेब गायकवाड हे उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here