भिगवण(प्रतिनिधी: रोहित बागडे):भिगवण येथील रोटरी क्लब नेहमी नवनवीन आणि अनोखे उपक्रम राबवत असते. बारावीच्या परीक्षार्थींना शुभेच्छा देण्यासाठी भिगवण रोटरी क्लबने शाळा-महाविद्यालयांच्या बाहेर शुभेच्छा व स्वागत उपक्रम आयोजित केला होता. यामध्ये विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प तसेच कविड च्या काळात विद्यार्थ्यांना काळजी म्हणून मास्क व सॅनिटायझर सह परिक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच पुणे येथील रोटरी क्लब मिटाऊन चे रो.अभिजीत मस्कर, यांनी मास्क उपलब्ध करून दिलेयेथील कला महाविद्यालय व भैरवनाथ कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय खाडे माजी अध्यक्ष संपत बंडगर संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, संतोष सवाने, किरण रायसोनी, नियोजित अध्यक्ष डॉ अमोल खनावरे, खजिनदार प्रदीप ताटे, कुलदीप ननावरे, कला महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव वाळुंज, डॉ प्रशांत चवरे, प्रा सुरेंद्र शिरसाट, भैरवनाथ प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गावडे , प्रा. धनाजी मत्रे, प्रा. निलेश जाधव, प्रा. समीर बळे प्रा.मोरे, व सौ काळे मॅडम उपस्थित होते.