आज भिगवण येथे मदनवाडी पुलाच्या खाली भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बेताल वक्तव्य करत आपले संस्कार आणि पक्षाची संस्कृती दाखवली याच्या निषेधार्थ भिगवण येथे नाना पटोले यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या नाना पटोले यांनी पंतप्रधान विषयी वापरलेले शब्द आणि पंतप्रधानांना मारण्याची दिलेली धमकी यासंदर्भात नाना पटोले यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी न वापरलेले शब्द बोलले असताना देखील महाराष्ट्रातील दडपशाही सरकारने त्यांना अटक केली मग पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पटोले यांना तात्काळ अटक करावी अशी आग्रही मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव आकाश कांबळे यांनी केली. यावेळी किसान मोर्चा प्रमुख माऊली चवरे,भटके-विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस गजानन वाकसे आदींनी भाषणे केली.
यावेळी आबासाहेब थोरात, गणेश भांडवलकर, राम आजबे, ललित होले, प्रेम कुमार जगताप, निखील मगर, माऊली मारकड, हेमंत काजळे, पांडुरंग सूळ, हनुमंत निंबाळकर, सुग्रीव साठे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची भेट घेत नाना पटोले यांच्या वरती गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करून त्यांना निवेदन देण्यात आले.