इंदापूर ता. प्रतिनिधी सचिन शिंदे
भिगवण येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
इंदापूर || भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे सोलापूर हायवे रोडवर उजनी धरणाचे बँक वॉटरचे पुलावर एका अज्ञात वाहनाने अंदाजे ४५ वर्षीय पुरुषाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली असून मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.या संदर्भात भिगवण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन व अज्ञात वाहन चालकाविरुध्द भा.द.वी.क 304(अ),279,337, 338, मो.वा.का.क 184 ,134/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिगवण पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,रविवारी पहाटे भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे सोलापूर हायवे रोडवर उजनी धरणाचे बँक वॉटरचे पुलावर एका अज्ञात वाहनाने अंदाजे ४५ वर्षीय पुरुषाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला.सदर ठिकाणी रहदारीचे असल्याने सदर मयत इसमाच्या मृत शरीरावरून इतर वाहने गेल्याने मयत इसमाच्या शरिराचा चेंदामेंदा झाला आहे.पुढील तपास भिगवणचे सहा पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष सुपनवर करीत आहेत.