भिगवण प्रतिनिधी : रोहित बागडे
भिगवण:कर्मयोगी चे संचालक पराग भाऊ जाधव यांनी काल भिगवण आणि पंचक्रोशीतील जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना आवाहन केले की सणा सुदीच्या काळात बाजारपेठेमध्ये होणारी गर्दी यामुळे कोरोनाचा प्रभाव वाढीस लागू शकतो यामुळे प्रत्येक व्यक्तीने जबाबदारी पूर्वक मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन केले तर कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात,या त्रिसूत्री मुळे आपण नक्कीच यशस्वी होऊ तरी आपण सर्वांनी या कोरोना नियमांचे पालन करावे असे आव्हान पराग भाऊ जाधव यांनी भिगवनकर जनतेला केले.
त्याच बरोबर ते म्हणाले की,तुम्ही मास्क वापरत नसाल, तुम्ही सामाजिक अंतर पाळत नसाल तुम्ही जर कोरोनाचे नियमांचे पालन करत नसाल, तर तुम्ही स्वतः बरोबर दुसऱ्यालाही संकटात टाकत आहात. ज्यांचे लसीकरण राहिले आहे त्यांनी लसीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे.आपण प्रत्येकाने कोरोना नियमांचे पालन करताना त्रिसूत्रीचा वापर करा,असे आवाहनही पराग जाधव यांनी केले.