यवत : भारतीय जैन संघटना पुणे विभागाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवड शनिवारी पुणे येथे झाली. संघटनेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी भिगवण येथील सचिन बोगावत तर उपाध्यक्षपदी दौंड तालुक्यातील राहू येथील हर्षल भटेवरा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
हर्षल भटेवरा हे दौंड तालुक्यामध्ये अनेक समाज उपयोगी रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड, शाळकरी मुलांना मदत असे कार्यक्रम घेत असतात. कोविड काळामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेले आहे. त्याबद्दल त्यांचा अनेक राजकीय नेत्यांकडून सन्मानपत्र देऊन गौरवही करण्यात आला आहे. त्यांच्या निवडीचे पत्र महावीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजयकांत कोठारी, भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नंदकिशोर साखला, राज्य सचिव दीपक चोपडा, पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र सुराणा यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमास विजय पारख, संतोष भन्साळी, पृथ्वीराज धोका, सुरेश गादिया, प्रकाश कटारिया, सुरेखा बेताला, श्रीपाल ललवाणी, मनोज पोखरणा, कमलेश गांधी, मनोज गुंदेचा, श्रेणिक शहा, गिरीश मुनोत, राहुल गुंदेचा, महावीर पारख, प्रीतम गांधी, संदेश गादिया, शुभम कटारिया, मनोज शेलोत, हितेश सुराणा, अतुल बोरा व त्यांच्या समवेत पुणे शहर आणि परिसर मधील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांचे आभार संतोष बन्साळी यांनी मानले.