भारतीय टीमचा यष्टीरक्षक आणि डावखुरा तुफानी फलंदाज ऋषभ पंत बाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतसोबत मोठी दुर्घटना घडली आहे. दिल्ली-डेहराडून महामार्गावर रुरकीजवळ त्यांच्या कारला अपघात झाला आहे. ऋषभ पंतची कार डिव्हायडरला धडकली आणि आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. पंतला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत घरी परतत असताना रुरकीजवळ कार अपघात झाला. ताज्या बातम्यांनुसार, त्यांना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांच्या कपाळावर, पाठीवर आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.अपघातस्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये ऋषभ पंतची कार वेगात रेलिंगला धडकली आणि आग लागली. या धक्कादायक अपघाताच्या बातमीवर क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी आपल्या प्रतिक्रियेत भारतीय क्रिकेटपटूला लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.