भाटनिमगाव गावासाठी 3 कोटी 31 लाखाचा निधी, उद्या आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार विविध कामांचे उद्घाटन व भूमिपूजन व जाहीर सभाही

सन 2024 यावर्षी आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावात भरघोस निधी देत जाहीर सभा करत असून प्रत्येक गावामध्ये रस्ते गटारी सूशोभीकरण इत्यादीची कामे प्रगतीपथावर आहेत त्याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव या गावात 3 कोटी 31 लाख निधीच्या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ पार पडणार आहे आणि याच दिवशी सायंकाळी 7 वाजता जाहीर सभा ही होणार आहे.
उद्या होणाऱ्या विकास कामांच्या उद्घाटनांमध्ये मौजे भाटनिमगाव येथे हर घर जल योजनेअंतर्गत 1 कोटी 24 लाखाचा निधी त्याचप्रमाणे बेडसिंग भाटनिमगाव दुरुस्ती 1 कोटी ,शेख फरीद बाबा दर्गा बांधकाम 40 लाख, भैरवनाथ मंदिर सभा मंडप दुरुस्ती 10 लाख, निमगाव बेडसिंग रोड ते देवकाते वस्ती रस्ता 6 लाख ,महादेव जगताप ते बालाजी माने वस्ती रस्ता 10 लाख, भाटनिमगाव चौक ते मनोहर भोसले रस्ता 10 लाख, शरद गवळी ते भाटनिमगाव चौक रस्ता 7 लाख,भाट निमगाव रस्ता 10 लाख ,दत्त मंदिर सभा मंडप बांधणे 5 लाख, मारुती मंदिर सभा मंडप 5 लाख या कामांची भूमिपूजन व उद्घाटन समारंभ उद्या ग्रामपंचायत कार्यालय चौकात भाटनिमगाव या ठिकाणी होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा प्रदीप दादा गारटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर मामा भरणे,अभिजीत तांबिले,बापूराव शेंडे ,दत्तात्रय घोगरे ,हनुमंत आबा कोकाटे ,श्रीमंत ढोले,संग्राम पाटील, साधनाताई केकान,प्रताप आबा पाटील ,सचिन सपकाळ,दीपक भाऊ जाधव ,संजय देवकर, अतुल झगडे ,सतीश पांढरे ,नवनाथ आबा रुपनवर इत्यादी प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे त्याचप्रमाणे हनुमंतराव जगताप, कैलास शिंदे, राजेश अवचर ,बाळासाहेब जाधव ,नाना उंबरे, मारुती कोळेकर, हनुमंत जमदाडे, प्रवीण बाबर, शिवाजी तरंगे ,दिलीप भोंग,आबा गाडे ,शांतीलाल सावंत ,विभीषण यादव ,ऋषी देवकर, विठ्ठल महाडिक, दादासाहेब भांगे ,भागवत काटकर, नवनाथ डाके ,आदित्य शिंदे ,हनुमंत घोडके ,विलास चव्हाण ,दिलीप पाटील, गणेश पाटील, अनंता ननवरे ,सुनील बोराटे, आदेश शिंदे ,बाजीराव उंबरे ,सोमनाथ जावळे सिताराम जानकर, विजय सोनवणे ,प्रकाश निकम, सुभाष गायकवाड ,वसंत मोरे ,संदेश शिंदे ,ओंकार बन ,सुभाष तरंगे, सतीश चित्राव ,काशिनाथ ननवरे ,आबासो देवकाते ,नितीन निकम, तानाजी इजगुडे इत्यादी सन्माननीय उपस्थिती या कार्यक्रमास लाभणार आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here