इंदापूर: भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी बैठक वसंत स्मृती दादर मुंबई या ठिकाणी पार पडली यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव आकाश कांबळे यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली. कांबळे यांच्याकडे युवा वॉरियर्स पश्चिम महाराष्ट्र संयोजक पदाची देखील जवाबदारी आहे. पक्षवाढीसाठी कांबळे हे पूर्ण वेळ काम करत आहेत म्हणून पक्ष नेतृत्वाने त्यांना संधी दिलेली आहे.
यावेळी मा.मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडवणीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, आमदार आशिष शेलार, मा.मंत्री हर्षवर्धनजी पाटील व भाजयुमो चे प्रदेशाध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळामध्ये युवकांची,युवतींचे,विद्यार्थ्यांची,एकजूट करून पक्ष वाढीसाठी व युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे काम करेल असा विश्वास आकाश कांबळे यांनी व्यक्त केला. यावेळी भाजयुमो चे महामंत्री व पुणे मनपा चे नगरसेवक सुशिलजी मेंगडे, शिवानी दाणी,राहुल लोणीकर,अनुप मोरे व कोल्हापूर जिल्ह्याचे भाजयुमो चे अध्यक्ष नगरसेवक विजय खाडे पाटील व सर्व महामंत्री व पदाधिकारी उपस्थित होते.