भयानक वास्तव..! टाचा घासत रुग्ण हॉस्पिटलमधून बाहेर; व्हिडिओ व्हायरल, ‘ससून’कडे व्हिलचेअर नाहीत?

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांअभावी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी घडली होती. या घटनेमुळे पुणे शहरासह राज्यभरातून संतापाची लाट उसळून आली होती.यातच पुण्यातील आणखी एका रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. ससून रुग्णायातील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून येथे रुग्णांची काळजी कशाप्रकारे घेतली जाते? त्यांना कशी वागणूक दिली जाते? याचा हा व्हिडिओ जिवंत उदाहरण आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयातील वार्डमधून बाहेर आणण्यासाठी चक्क रुग्णालयाकडे व्हिलचेअरच नसल्याचे भयान वास्तव समोर आले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक व्यक्त वार्डमधून उपचार करुन आपल्या पायांच्या टाचा घासत रुग्णालयातून बाहेर येत असल्याचे दिसत आहे. या व्यक्तीने आपला अपघातामध्ये पाय गमावला आहे. उपचार घेण्यासाठी नागपूरहून ही व्यक्ती ससून रुग्णालयात आली होती. मात्र, रुग्णाला सोडायला व्हिलचेअरच उपलब्ध नव्हती. यामुळे आता रुग्णालयाला रुग्णाची किंमत आहे का नाही असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
रुग्ण काय म्हणाला ?
माझा पाय खराब होता, म्हणून मी हॉस्पिटलमध्ये आलेलो होतो. त्यांनी फक्त माझ्या पायाची ड्रेसिंग करुन दिली आणि मला हाकलून लावलं, असल्याचे ही व्यक्ती म्हणाली. तसेच मला त्यांनी व्हिलचेअरसुद्धा दिली नाही. मी घासत घासत गेलो आणि घासत घासत आलो. मी नागपूरहून इथे आलेलो आहे, माझं पुण्यात कुणी नाही. पण मी इथे आल्यानंतर यांनी मला हाकलून लावलंय.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here