बोरी (प्रतिनिधी: प्रविण पिसे): बोरी गावचे सुपुत्र श्री. ज्ञानदेव (माऊली) नामदेव ठोंबरे साहेब…पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील प्रामाणिक, सहकार्यपूर्ण, विश्वासू 34 वर्षांची कारकीर्द..त्याग, सचोटी, समाजभान, पारदर्शकता, निर्भयता, धार्मिकता या गुणवैशिष्ट्यांनी युक्त व्यक्तिमत्व..तळागाळातील माणसांना आधार वाटणारा आपला माणूस..कधीही कुठेही बँकिंग संबंधी प्रश्नांचे शंका समाधान करणारा प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्याची उत्तरे शोधणारा एक कार्यकर्ता अधिकारी..शहरी जीवनशैलीचा त्याग करत कायम ग्रामीण जीवन आणि सामान्य माणूस यांच्याशी घट्ट नाळ जोडलेला, जन्मभूमी आणि कर्मभूमीशी ईमान राखत समर्पित भावनेने काम करणारा भूमिपुत्र…बुडती हे जन | न देखवे डोळा || येतो कळवळा | तुका म्हणे || या तुकोबारायांच्या प्रमाणानुसार समाजाची चिंता कायम हृदयात वाहणारा सच्चा समाजसेवक..साहेब, आज आपल्या प्रदीर्घ अशा 34 वर्षांच्या सेवेचा समारोप होतोय.. आपल्या आयुष्याची नवी कारकीर्द उद्यापासून सुरु होतेय…खरं तर आपल्याकडे पाहून आपण निवृत्त होताय हे मन स्वीकारतच नाही. पण कालचक्र कसे थांबणार…साहेब ,आपल्या व्यक्तिमत्वाचे वर्णन केवळ तुकारामांच्याच शब्दांतच होऊ शकते… विवेकासहित वैराग्याचे बळ | धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा ||या तेजामुळे आपण साठीचे झाले आहात हे वाटतच नाही. म्हणून हे वय फक्त कागदावरचेच..साहेब , आपण प्रशासकीय कामातून जरी बाजूला होत असला तरी समाजाला नेहमीच आपली गरज आहे.. आपले यापुढील आयुष्य यासाठीच खर्च करावे अशी आमची प्रेमाची विनंती आपल्याला राहील.आपल्या सहवासात येणारा माणूस पैशाने कदाचित मोठा होणार नाही पण तो ‘ निर्भय ‘ नक्कीच होईल याची खात्री आहे. याचे उत्तर पुन्हा तुकोबारायांच्याच प्रमाणात सापडते..सत्य आम्हां मनी नोहे गबाळाचे धनी | देतो तीक्ष्ण उत्तरे | पुढे व्हावयासी बरे ||आणखी काय लिहावे? आजच्या सेवापूर्तीनिमित्त आपणांस निरोगी आणि सुखी समाधानी आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा….
Home Uncategorized बोरी गावचे सुपुत्र श्री.ज्ञानदेव (माऊली) नामदेव ठोंबरे साहेब…पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील प्रामाणिक,विश्वासू...