बोरिऐंदी ता. दौंड येथे कोरोना नियंत्रण कक्षाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते उदघाटन.

जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, दौंड प्रतिनिधी
अजय तोडकर मो.7776027968

दौंड : बोरिऐंदी तालुका दौंड ग्रामपंचायत कार्यालय येथे आज कोरोना नियंत्रण कक्षाचे उदघाटन सरपंच गणेश दौंडकर उपसरपंच शुभांगी गायकवाड आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भारतीय जैन संघटना दौंड तालुका समन्वयक श्री.मयूरआबा सोळसकर,हवेली तालुका भारतीय जैन संघटना मार्गदर्शक विशाल टाटिया, हवेली तालुकाध्यक्ष पराग राठोड, सचिव निखिल चोरडिया उपस्थित होते.


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता,पुणे जिल्हा परिषद पुणे आणि भारतीय जैन संघटना यांच्या कोरोना मुक्त गाव अभियान या आव्हानाला प्रतिसाद देतं बोरिऐंदी गावात 5 प्रकारच्या समित्या तयार करून कोरोना नियंत्रण कक्ष चे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रम मध्ये ज्यांची या समिती मध्ये निवड केली यांना ग्रामपंचायत कडून नियुक्तीपत्रक देखील देण्यात आले.
भारतीय जैन संघटनेचे कार्य आणि या अभियान विषयी मार्गदर्शन भारतीय जैन संघटनेचे दौंड तालुका समन्वयक मयूर सोळसकर यांनी केले.


यावेळी कार्यक्रम आयोजन सरपंच गणेश दौंडकर, उपसरपंच शुभांगी गायकवाड,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सविता भोसेकर, रूपाली गोठे, भानुदास कुदळे,मा. सरपंच आणि पत्रकार एम. जी. शेलार,मा. उपसरपंच राजेंद्र तावरे,युवा कार्यकर्ते राजू भारती, प्रताप तावरे, राजेंद्र शेलार, तंटामुक्ती अध्यक्ष विनायक गायकवाड, मा. सरपंच प्रकाश टिळेकर, माणिक भोसेकर,रोहिदास भोसेकर, शहाजी शेलार, शंकर झुरंगे, स्वप्निल गोठे आदी उपस्थित होते. कार्यक्रम सूत्रसंचालन आणि आभार तंटामुक्ती अध्यक्ष विनायक गायकवाड यांनी केले.



पहा इंदापूर तालुक्यातील चिंकारा हरीण शिकार प्रकरण.खालील लिंक ओपन करा.👇👇

https://youtu.be/bXXoCMMUxq0


 

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here